• Download App
    पंजाबमध्ये पोलीसच बनले हैवान, बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला निर्वस्त्र करून गुप्तांगाला दिले विजेचे शॉक|In Punjab police stripped the woman and gave her an electric shock to withdraw her rape complaint

    पंजाबमध्ये पोलीसच बनले हैवान, बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला निर्वस्त्र करून गुप्तांगाला दिले विजेचे शॉक

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड : पंजाबमध्ये पोलीसच हैवान बनले आहेत. एका बलात्कार पीडित महिलेने बलात्काराची तक्रार मागे घ्यावी यासाठी पोलीस ठाण्यात तिला निर्वस्त्र करून गुप्तांगाला वीजेचे शॉक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.In Punjab police stripped the woman and gave her an electric shock to withdraw her rape complaint

    पीडिताने म्हटले की, सीआयए स्टाफ-१ च्या बरखास्त एएसआयविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी अरनीवाला पोलिसांनी माझ्यावर दबाब आणला होता. त्याला नकार दिल्यावर माझा छळ केला गेला. पोलीस ठाण्यावर गेल्यावर पोलीस ठाण्याच्या प्रमुखाने तडजोडीसाठी दबाव आणला.



    आरोपीच्या कुटुंबाकडून २०-२५ लाख रुपये मिळवून देण्याचे आशसन दिले. मी ते नाकारल्यावर मला ड्रगचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. मला निर्वस्त्र करून गुप्तांगाला करंटही दिले गेले. त्याचा व्हिडीओही बनवला गेला. कोऱ्या कागदांवर सह्या करून घेतल्या व त्यांना हवे तसे म्हणणे लिहून घेतले गेले.

    अरनीवाला पोलीस ठाण्यात बरखास्त एएसआयविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारी पीडिता आणि साक्षीदाराला अवैधरीत्या ताब्यात ठेवून त्यांचा छळ केल्याच्या आरोपावरून ठाण्याचा अधिकारी मनजीत सिंग याला निलंबित करण्यात आले. याचबरोबर फिरोजपूरच्या एसएसपीने पीडितेला निर्वस्त्र करून गुप्तांगाला करंट लावल्याच्या आरोपाच्या चौकशीचेही आदेश दिले गेले आहेत.

    In Punjab police stripped the woman and gave her an electric shock to withdraw her rape complaint

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- महाराष्ट्रात डबल नव्हे ट्रिपल इंजिन सरकार हवे, ‘​​​​​​​स्थानिक’च्या निवडणुकीत विरोधकांचा सफाया करा

    Nanded : नांदेडमध्ये शेतकऱ्याने फोडली तहसीलदारांची गाडी; सरकारच्या पॅकेजमधील अतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्याने संताप अनावर

    ​​​​​​​Election Commission : राजस्थान, एमपी, यूपी, बंगालसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR; 7 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार