विशेष प्रतिनिधी
कोहिमा : नागालॅँडमध्ये भारतीय जनता पक्षाने महिला शक्तीला मजबूत करण्यासाठी राज्यसभेच्या जागेसाठी महिला शाखेच्या अध्यक्षा एस. फांगनॉन कोन्याक यांना उमेदवारी दिली आहे.In Nagaland, the BJP will make history by fielding a woman candidate for the only Rajya Sabha seat.
राणो एम. शैझा 1977 मध्ये लोकसभेवर निवडून आल्यानंतर संसदेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एस. फांगनॉन कोन्याक या दुसºया महिला ठरणार आहेत. एक फांगनॉन या नागा समाजाताील कोन्याक या जमातीच्या आहेत. 5 डिसेंबर 2021 रोजी लष्कराच्या तुकडीने केलेल्या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचारात कोन्याक जमातीचे चौदा आदिवासी मारले गेले.
मात्र, त्यांना उमेदवारी देण्यामागे हे कारण नाही. त्या सक्षम नेत्या आहेत. त्यांनी आजपर्यंत पक्षासाठी केलेल्या कामामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे, असे भाजपाने म्हटले आहे.
नागालँडमध्ये विरोधी पक्ष नसलेल्या सरकारमध्ये भाजप हा धाकटा पक्ष आहे. नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी हे त्यांचे मित्रपक्ष आहेत. कोन्याक या भाजपने शुक्रवारी जाहीर केलेल्या राज्यसभेच्या चार उमेदवारांपैकी एक आहेत.
आसाममधील पवित्रा मार्गेरिटा, हिमाचल प्रदेशातील सिकंदर कुमार आणि त्रिपुरातील माणिक साहा यांचाही राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेल्यांमध्ये समावेश आहे.
In Nagaland, the BJP will make history by fielding a woman candidate for the only Rajya Sabha seat.
महत्त्वाच्या बातम्या
- अमेठीत होळीच्या मारामारीत आठ जण जखमी दोघे मृत; दोन गंभीर जखमीं
- Congress Debacle : “आप” – तृणमूलची ज्युनिअर पार्टनर व्हायला काँग्रेस तयार; पी चिदंबरम यांची “ऑफर
- औरंगाबादचा मटका किंग आबेद पठाणचा नाना पटोले यांच्या हजेरीत काँग्रेसमध्ये प्रवेश!!
- Kolhapur Byelection : शिवसेनेची काँग्रेससाठी माघार; भाजपचे पदाधिकारी राजू शेट्टींना भेटले; कोल्हापूर उत्तर