जाणून घ्या संपूर्ण प्रकरण आणि नेमकी कुठे घडली घटना?
विशेष प्रतिनिधी
कलबुर्गी : कर्नाटकातून बुरख्याबाबत एक नवीन प्रकरण समोर आले आहे. येथे एका बस चालकाने शाळकरी विद्यार्थिनींना बुरखा घातला नसल्याने बसमध्ये बसू दिले नाही. ही घटना समोर येताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण? In Karnataka Driver Stops Girl Students From Boarding Bus Without Burqa
हे प्रकरण कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील आहे. जिथे काही मुस्लीम मुली बुरखा न घालता बसमध्ये चढू लागल्या, तेव्हा चालकाने त्यांना आधी बुरखा घालून या आणि नंतर बसमध्ये बसण्यास सांगितले. यासोबतच तिथे काही मुलींनी हिजाब परिधान केलेला होता मात्र त्यांनाही बसमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. बस चालकाने सांगितले की, मुस्लीम विद्यार्थिनी बुरखा घालूनच बसमध्ये प्रवास करू शकतात.
इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बस चालकाने विद्यार्थिनींना सांगितले की, जर तुम्ही मुस्लीम असाल तर बुरखा घाला, हिजाब नाही. त्यानंतरच तुम्हाला बसमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल. एका विद्यार्थिनीने सांगितले की, चालकाने तिच्या धार्मिक ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिला बुरखा घालण्यास सांगितले. विद्यार्थिनीने म्हणणे न ऐकल्याने तिच्याशी दुर्व्यव्हार करण्यात आला. यासह विद्यार्थिनीला तेथून हाकलले. याबाबत आजूबाजूच्या लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली असता बस चालकाने सांगितले की, बस चालण्याच्या स्थितीत नव्हती आणि विद्यार्थिनी गोंधळ घालत असल्याने त्यांना बसू दिले गेले नाही.
In Karnataka Driver Stops Girl Students From Boarding Bus Without Burqa
महत्वाच्या बातम्या
- कटिहार गोळीबार प्रकरणी गिरीराज सिंह यांचे नितीश कुमार सरकारवर टीकास्त्र, म्हणाले ‘धृतराष्ट्र बनले आहेत…’
- द्रष्टे उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर; राज्य सरकारची घोषणा
- राष्ट्रवादीत कोण कुणाकडे?? : झाकली मूठ फक्त 54 आमदारांची; पण स्वप्नं मात्र मुख्यमंत्री पदाची!!
- भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात अडकलेल्या ‘सिंधू साधना’ संशोधन जहाजातून आठ शास्त्रज्ञांसह ३६ जणांची केली सुटका!