• Download App
    अवघ्या चार दिवसांत अदानींना ९२ हजार कोटींचा फटका, शेअर बाजार गडगल्याने संपत्तीत १७ टक्के घट | In just four days, Adani was hit by Rs 92,000 crore

    अवघ्या चार दिवसांत अदानींना ९२ हजार कोटींचा फटका, शेअर बाजार गडगल्याने संपत्तीत १७ टक्के घट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – वाढत्या कोरोनाचे चटके केवळ सर्वसमान्यांच्याच खिशाला बसत नसून त्यातून अगदी अब्जाधीशही सुटत नाहीत. गेल्या चार दिवसांत शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड सुरु असून त्याचा जबरदस्त फटका अब्जाधीश गौतम अदानींना बसला आहे. केवळ चार दिवसांत अदानी यांच्या मालकीच्या कंपन्यांचे शेअर जबरदस्त आपटले असून यामुळे अदानी यांना तब्बल ९२ हजार कोटींचा तोटा झाला आहे. यामुळे त्यांची संपत्ती ४.४८ लाख कोटींवर येवून पोहोचली आहे. In just four days, Adani was hit by Rs 92,000 crore

    संपत्तीत १७ टक्के घट

    गेल्या चार दिवसांत आदानी यांच्या संपत्तीत तब्बल १७ टक्के घट झाली आहे. यात सर्वांधिक तोटा अदानी पोर्ट या कंपनीला झाला आहे. या कंपन्यांचे शेअर तब्बल वीस टक्क्यांनी घटले आहेत. शेअर बाजारात अदानी यांच्या अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायेझस या अन्य कंपन्याही लिस्टेड म्हणजेच नोंदणीकृत आहेत. या सर्वच सहा कंपन्यांचे शेअर कमी अधिक प्रमाणात घसरले आहेत.

    सात एप्रिलला या सहा कंपन्यांचे शेअर बाजारातील भागभांडवल तब्बल ५.४० लाख कोटी रुपये इतके होते. मात्र अवघ्या आठवडाभरात बाजार कोसळल्याने ते ४.४८ लाख कोटींवर आले आहे. सात एप्रिलला अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर गेल्या ५२ आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. या कंपन्यांचे एकत्रित भागभांडवल तब्बल आठ लाख कोटींपेक्षाही जास्त झाले होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अदानींच्य कंपन्यांना बसला आणि त्यांच्या शेअरचे भाव कोसळळे.

     

    जगात सर्वाधिक संपत्ती निर्मिती

    गेल्या पाच वर्षांत अदानी यांची शेअर बाजारात घोडदौड सुरु आहे. केवळ गेल्या चार वर्षांतच त्यांच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये जळपास ४९६ टक्क्यांनी वाढ झाली. त्यमुळे अदानी श्रीमंतीच्या शिड्या भराभर वेगाने पार करू लागले. संपत्ती निर्माण करण्याच्या बाबतीत त्यांनी गेल्या वर्षी अमेझॉनचे जेफ बेजोस तसेच टेस्लाचे एलन मस्क या जागतिक उद्योजकांनाही मागे सारले होते. २०२० मध्ये अदानींची संपत्ती १६ अब्ज डॉलर्सवरुन चक्क ५९.९ अब्ज डॉलर्स इतकी घसघशीत वाढली होती. त्यामुळे फोर्बसच्या यादीत त्यांनी १५५ व्या स्थानी झेप घेतली होती.

    In just four days, Adani was hit by Rs 92,000 crore

     

    विशेष बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले