वृत्तसंस्था
रांची : झारखंड मध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 25 रुपयांनी पेट्रोल स्वस्त केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून चालवल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी असून हेमंत सोरेन यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांना 10 लिटर पेट्रोल खरेदी पर्यंतच प्रत्येक लिटरमागे 25 रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे. In Jharkhand, petrol is not cheap at all
हेमंत सोरेन यांनी एका कार्यक्रमात पेट्रोल स्वस्त करण्याची घोषणा केली. त्यामुळे पेट्रोल झारखंडमध्ये पेट्रोल पंचवीस रुपयांनी स्वस्त झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी जोरदार चालविल्या.
परंतु त्यानंतर झारखंड सरकारने याचे सविस्तर तपशील जाहीर करून खुलासा केला आहे. गरीब आणि मध्यम वर्गातल्या लोकांना स्कूटर तीन चाकी अथवा छोटी गाडी यामध्ये पेट्रोल भरताना 25 रुपयांची सबसिडी दिली जाईल. परंतु ही सबसिडी फक्त 10 लिटर पेट्रोल पुरतीच मर्यादित असेल. 10 लिटर पेक्षा अधिक पेट्रोल खरेदीवर सबसिडी नसेल, असा खुलासा झारखंड सरकारने केला आहे. योजना येत्या प्रजासत्ताक दिनापासून 26 जानेवारी 2022 पासून लागू होईल.
In Jharkhand, petrol is not cheap at all
महत्त्वाच्या बातम्या
- Anil Deshmukh Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने केले मुख्य आरोपी, ७००० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल
- अमरावतीत खळबळ , प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- आरोग्य विम्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, विमा कंपनी मेडिक्लेम नाकारू शकत नाही, कारण… वाचा सविस्तर