वृत्तसंस्था
बीजिंग : चीनच्या अल्ट्रामॅरेथॉन स्पर्धेमध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बाययिन शहरात ही स्पर्धा आयोजित केली होती. In China Kills 21 In Ultramaratho due to Climet changes
अरुंद पायवाट असलेल्या डोंगरावर ही शर्यत आयोजित केली होती. डोंगरावर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस झाला. अचानक वातावरणात बदल झाला. शनिवारी स्पर्धकांनी दोन ते तीन हजार मीटरचे अंतर कापल्यानंतर वातावरणात अचानक बदल झाले.
स्पर्धक डोंगरावरच अडकल्याने संपूर्ण रात्रभर चाललेल्या बचावकार्याद्वारे तब्बल १५१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. १७२ स्पर्धकांपैकी २१ जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.
तापमान अचानक खाली आल्याने स्पर्धकांना शारीरिक अस्वस्थता जाणवू लागली होती. काही जण धावताना खोल दरीत पडले. मात्र, किती जण बचावले, याचा शोध घेतला जात आहे. याबाबतचे वृत्त चिनी वृत्तसंस्थेने दिले आहे.
In China Kills 21 In Ultramaratho due to Climet changes
महत्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथांचा कठोर निर्णय, रेमडेसिीवीरचा काळबाजार करणाऱ्यांवर उत्तर प्रदेशात रासुकाखाली कारवाई, संपत्तीही जप्त होणार
- पाकिस्तान्याशी मोबाईलवरून बोलताना गुप्तचर विभागाने पकडले, हेरगिरी करणाऱ्या शिक्षिका बहिणींना अटक
- डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर योगगुरू रामदेवबाबांकडून वादग्रस्त विधान मागे
- पुण्यात पहिल्या लाटेतच ६९ टक्के नागरिकांना कोरोना, सिरो सर्व्हेमध्ये झाले उघड
- टाटा स्टिल कंपनीचा निर्णय : कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वयाच्या साठ वर्षांपर्यंत कुटुंबाला पूर्ण वेतन, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च