• Download App
    बिहारमध्ये आता शहरातही धावणार लस एक्सप्रेस, नितीशकुमार यांची अनोखी योजना |In Bihar vaccine Express becoming popular

    बिहारमध्ये आता शहरातही धावणार लस एक्सप्रेस, नितीशकुमार यांची अनोखी योजना

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारमध्ये लसीकरण मोहिमेला वेग येण्यासाठी नितीशकुमार सरकारने नागरिकांना घराजवळ लस मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे.In Bihar vaccine Express becoming popular

    ग्रामीण भागानंतर आता शहरी भागातील नागरिकांना लशीसाठी रांगेत उभे राहण्याची किंवा लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही.बिहारच्या ग्रामीण भागात ‘लस एक्स्प्रेस’ला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर



    आता शहरी भागातील नागरिकांना आता घराजवळच लस उपलब्ध होणार आहे. यानुसार मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी १२१ लस एक्स्प्रेस रवाना केल्या.
    या योजनेनुसार घराजवळच लशीचे डोस दिले जाणार आहे.

    लस एक्स्प्रेस ही लोकांच्या घरांपर्यंत जाईल आणि तेथे लसीकरण मोहीम राबवली जाईल. अर्थात या माध्यमातून दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे.

    प्रत्येक गाडीत दोन व्हॅक्सिनेटर आणि एक डेटा एंट्री ऑपरेटर असणार आहे. प्रत्येक गाडीतून दररोज २०० लोकांचे लसीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. बिहारची लोकसंख्या सुमारे तेरा कोटी आहे. त्यामुळे या राज्यात लसीकरण होणा फार आवश्यक आहे.

    In Bihar vaccine Express becoming popularIn Bihar vaccine Express becoming popular

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस; राष्ट्रपती मुर्मू यांच्या भाषणाने सत्राची सुरुवात होईल, 2 एप्रिलपर्यंत चालणार

    Alankar Agnihotri : राजीनामा देणारे दंडाधिकारी हाऊस अरेस्ट; शंकराचार्यांचे समर्थन केल्याबद्दल निलंबित, डीएमला भेटण्यासाठी पोहोचल्यावर प्रवेश नाकारला

    Uma Bharti : उमा भारती म्हणाल्या- शंकराचार्यांकडून पुरावे मागून प्रशासनाने मर्यादा ओलांडली