वृत्तसंस्था
पाटणा : आत्तापर्यंत हिंदी सिनेमातले “आँखियोंसे से गोली मारे”, हे गाणे प्रसिद्ध होते. परंतु आता बिहारच्या राजकारणात “आँखियोंसे से गोली मारे” ऐवजी “जुबाँ से गोली मारे_ असे म्हणायची वेळ आली आहे…!!In Bihar politics now with eyes wide open No, shoot with the tongue
कारण बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अशी असा “तोंडी गोळीबार” सुरू झाला आहे. लालूप्रसाद यादव बिहारच्या राजकारणात पुन्हा ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्यांनी नितीश कुमार सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. त्यावर नितीश कुमार यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले होते, की लालू जी और क्या कर सकते है? ज्यादा से ज्यादा हमे गोली मरवा सकते है…!!
नितीश कुमार यांच्या या वक्तव्याला आज लालूप्रसाद यादव यांनी पोट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर दिले. ते म्हणाले, की हमने कहा नितीश कुमार जी का सरकार का विसर्जन हो रहा है. वह कहते है हमे गोली मार दे. मगर हम नितीश को क्यू गोली मरवा देंगे? वह तो खुद ही मर जायेंगे…!!
नितीशकुमार यांचे सरकार बिहारला खड्ड्यात घालत आहेत, असा आरोप देखील लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांची इंट्री झाल्याने राज्याच्या राज्यात पुन्हा एकदा रंग भरायला लागला आहे. लालूप्रसाद हे आपल्या बेबाक वक्तव्यासाठी कायमच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एन्ट्री घेतानाच नितीशकुमार सरकारवर जोरदार तोफ डागली आहे
In Bihar politics now with eyes wide open No, shoot with the tongue
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : विदर्भात शेतकऱ्यांनी दिवाळी आंधारातच करायची का? पश्चिम महाराष्ट्र, कोकणला अधिक मदत : अनिल बोंडे
- अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश!!; ज्येष्ठ नागरिकांना लुभावण्याचा प्रयत्न
- Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा निकाह लावणाऱ्या काझींचा खुलासा, म्हणाले- ‘लग्नाच्या वेळी मुसलमान होते संपूर्ण कुटुंब’
- PM मोदींची सत्तेतील 20 वर्षे, अमित शाह म्हणाले- “पंतप्रधान मोदींना आज माझ्यापेक्षा जास्त जनता ओळखते!”