• Download App
    बंगालमध्ये तृणमूलमधून भाजपामध्य इनकमींग सुरूच, मतदानाचे दोन टप्पे झाल्यानंतरही पक्षांतरे होताहेतच | In Bengal, incoming in BJP from Trinamool continues, even after two phases of voting

    बंगालमध्ये तृणमूलमधून भाजपामध्य इनकमींग सुरूच, मतदानाचे दोन टप्पे झाल्यानंतरही पक्षांतरे होताहेतच

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान दोन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. तरीही अजून तृणमूल कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात इनकमींग सुरूच  आहे. In Bengal, incoming in BJP from Trinamool continues, even after two phases of voting


    विशेष प्रतिनिधी

    अलीपूरदार : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान दोन टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. तरीही अजून तृणमूल कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात इनकमींग सुरूच  आहे.

     बंगालच्या अलीपूरदार जिल्ह्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत तृणमूल काँग्रेसचे नेते मोहन शर्मा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत भाजपमध्ये दाखल झाले आहेत.मोहन शर्मा हे तृणमूल काँग्रेसचे जुने नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी अलीपूरदार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी हाताळली होती. सोबतच ते अलीपूरदार जिल्हा परिषदेचे सल्लागारही होते. भाजपच्या सेंट्रल कमिटीचे महासचिव अरविंद मेनन यांनी मोहन शर्मा यांच्या हाती पक्षाचा झेंडा सोपवला.



    पश्चिम बंगालमध्ये अद्यापही सहा टप्प्यांमध्ये मतदान बाकी आहे. अशा वेळेस मोहन शर्मा यांनी पक्षाला दिलेल्या या जोरदार झटक्यामुळे पक्षाची मोठी पडझड होऊ शकते. याचं कारण म्हणजे मोहन शर्मा यांची अलीपूरदार जिल्ह्यात चांगलीच पकड असल्याचे म्हटले जाते.

    पश्चिम बंगालच्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. २७ मार्च आणि १ एप्रिल रोजी अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलंय. तिसºया टप्प्यातील ३१ जागांसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

    In Bengal, incoming in BJP from Trinamool continues, even after two phases of voting


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!