• Download App
    अहमदनगर जिल्ह्यात 8 हजार मुलांना कोरोना; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील धक्कादायक चित्र In Ahmednagar district 8,000 children are Afeected due to Coronavirus ; Shocking picture of the Second wave

    अहमदनगर जिल्ह्यात 8 हजार मुलांना कोरोना; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील धक्कादायक चित्र

    वृत्तसंस्था

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याबाबतचे वृत्त ‘एबीपी माझा’ ने दिले आहे. In Ahmednagar district 8,000 children are Afeected due to Coronavirus ; Shocking picture of the Second wave

    कोरोनाच्या दुसरी लाट सुरु असताना लॉकडाऊनचे निर्बंध काही जिल्ह्यात शिथिल केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही चिंताजनक माहिती उघड होत आहे.
    पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका महाराष्ट्राला बसल्याची आकडेवारी सांगते. बाधितांची संख्या, वाढता मृतांचा आकडा, ऑक्सिजनसह बेडची कमतरता यासारख्या आरोग्य यंत्रणांतील त्रुटींचाही सामना महाराष्ट्राने केला आहे. मृतांचा सर्वाधिक आकडाही महाराष्ट्राचाच आहे.



     

    कोरोनाची तिसरी लाट आधीच्या दोन लाटांपेक्षा अधिक भयावह असणार आहे. तसेच या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असणार आहे, असे सूतोवाच तज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान, ही तिसरी लाट केव्हा येणार ? यासंदर्भात स्पष्ट दावे केलेले नाहीत. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधित मुलांची आकडेवारी धक्कादायक आणि चिंता वाढविणारी मानली जात आहे.

    कोरोनाची तिसरी लाट आणि तयारी

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारनं सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोरोना वॉर्डची तयारी सुरु केली आहे. सांगलीतील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्पेशल कोरोना वॉर्डही तयार झाला आहे. येथे पाच मुलांना कोरोना झाला असून त्यांच्यावर स्पेशल वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत.

    In Ahmednagar district 8,000 children are Afeected due to Coronavirus ; Shocking picture of the Second wave

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते