• Download App
    लडाखच्या जर्दाळूची पहिली खेप दुबईला रवाना; तब्बल ५० वर्षांनी निर्यात बंदी उठवली; उत्पादक सुखावले |In a major boost to agricultural products, a consignment of 150 kg Raktsey Karpo, the sweetest apricot, was sent to an international market in Dubai.

    लडाखच्या जर्दाळूची पहिली खेप दुबईला रवाना; तब्बल ५० वर्षांनी निर्यात बंदी उठवली; उत्पादक सुखावले

    वृत्तसंस्था

    लडाख : लडाख हे जर्दाळूच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु गेल्या ५० वर्षांपासून जर्दाळूवरील निर्यात बंदी केंद्रातील भाजप सरकारने उठविली आहे. त्यामुळे परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तसेच जर्दाळूची पहिली खेप दुबईला रवाना सुद्धा झाली आहे.In a major boost to agricultural products, a consignment of 150 kg Raktsey Karpo, the sweetest apricot, was sent to an international market in Dubai.

    लडाखमधील कारगिल येथे जर्दाळूचे मोठे उत्पादन घेतले जाते. त्याची राज्यात आणि परदेशात मोठी मागणी असते. आता तर त्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीला परवानगी दिली आहे.त्यामुळे उत्पादक शेतकरी आनंदले आहेत.



    लडाखमधून दुबईला १५० किलो जर्दाळू प्रथमच म्हणजे ५० वर्षांनंतर निर्यात केले आहेत. आता विविध राज्यांत आणि परदेशातही त्याची निर्यात केली जाणार आहे. त्यामुळे उत्पादकांना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

    लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल (एलएएचडीसी) च्या नुसार देशातील ६५ टक्के जर्दाळूचे उत्पादन लडाखमध्ये होते. दुबईला जर्दाळू निर्यात होण्यापूर्वी तो लेह, लडाखमार्गे मुंबईला रवाना होतो. त्यानंतर तो दुबईला रवाना केला जातो. एपीडाने त्यासाठी पुरवठा साखळीची सुविधा तयार केली आहे. केवळ जर्दाळूच नव्हे तर लदाखमधील अन्य शेती उत्पादने आणि फळे देश आणि परदेशात निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

    In a major boost to agricultural products, a consignment of 150 kg Raktsey Karpo, the sweetest apricot, was sent to an international market in Dubai.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते