• Download App
    अनैतिक संबंध गुन्हा नाहीत, विवाहित असले तरी दुसऱ्याशी लैंगिक संबंध गुन्हा नाही, न्यायालयाचा निकाल|Immoral relations are not a crime, having sex with another even if married is not a crime, court ruling

    अनैतिक संबंध गुन्हा नाहीत, विवाहित असले तरी दुसऱ्याशी लैंगिक संबंध गुन्हा नाही, न्यायालयाचा निकाल

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगढ : विवाहित असलेल्यानी दुसऱ्या स्त्री किंवा पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवल्यास त्याला अनैतिक म्हटले जाते. पण हे अनैतिक संबंध गुन्हा ठरत नाहीत असे न्यायालयाने म्हटले आहे. विवाहित स्त्री किंवा पुरुषाने दुसऱ्याशी लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही. एखाद्या व्यक्तीचं लग्न झाले असेल तरी परस्पर सहमतीने संबंध ठेवत असल्या अशा प्रकारात जोडप्याला सुरक्षा मागण्याचा अधिकार असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.Immoral relations are not a crime, having sex with another even if married is not a crime, court ruling

    पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात एका प्रकरणाच्या सुनावणीत हे मत नोंदवण्यात आलं असून यानं व्यक्त केलं आहे. घटस्फोटासाठी अर्ज केलेला एक तरुण सध्या दुसऱ्या तरुणीसोबत राहत असून पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे. यावर न्यायालयाने त्याला सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत.



    लग्न झालेली व्यक्ती जर आपल्या जोडीदाराशिवाय इतर कुणाशी लैंगिक संबंध ठेवत असेल, तर अशा व्यक्तींना सुरक्षा देण्याची गरज नसल्याचा निकाल यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता. सरकारी वकिलांनी या निकालाचा संदर्भ पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात दिला. मात्र त्या निकालाशी आपण सहमत नसून सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड विधानाचं कलम 497 हे असंवैधानिक असल्याचं म्हटल्याचा संदर्भ हायकोर्टाने दिला.

    एखाद्या प्रौढ व्यक्तीने परस्पर सहमतीने इतर व्यक्तींशी संबंध ठेवणे, हा गुन्हा नसून अशा व्यक्तींच्या जीवाला धोका असेल, तर सुरक्षा पुरवणे योग्यच असल्याचं मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. या केसमधील तरुणाने घटस्फोटासाठी अर्ज केला असून त्याचा निकाल प्रलंबित आहे. मात्र सध्या तो सहमतीने वेगळ्या तरुणीसोबत राहत असून त्याला सुरक्षा नाकारण्यासाठी कुठलेही कायदेशीर कारण दिसत नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

    Immoral relations are not a crime, having sex with another even if married is not a crime, court ruling

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची