• Download App
    इंडियन मेडिकल असोसिएशनचा रामदेव बाबांविरुद्ध 1000 कोटींचा मानहानीची दावा, म्हणाले- लेखी माफी मागा । IMA 1000 Cr Defamation Notice To Ramdev Baba, Demands written Apology

    इंडियन मेडिकल असोसिएशनचा रामदेव बाबांविरुद्ध १००० कोटींचा मानहानीचा दावा, म्हणाले- लेखी माफी मागा!

    IMA 1000 Cr Defamation Notice To Ramdev Baba : कोरोना काळात अ‍ॅलोपॅथीच्या औषधांचा वापर आणि अकाली मृत्यूबद्दल डॉक्टरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे योगगुरू रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उत्तराखंड सरकारने रामदेव बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केली आहे. तसेच आज आयएमएने रामदेव यांना 1000 कोटींची मानहानीची नोटीस पाठविली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, रामदेव बाबा यांनी त्यांच्या कृत्याबद्दल लेखी माफी मागितली पाहिजे. IMA 1000 Cr Defamation Notice To Ramdev Baba, Demands written Apology


    विशेष प्रतिनिधी

    देहरादून : कोरोना काळात अ‍ॅलोपॅथीच्या औषधांचा वापर आणि अकाली मृत्यूबद्दल डॉक्टरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे योगगुरू रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उत्तराखंड सरकारने रामदेव बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केली आहे. तसेच आज आयएमएने रामदेव यांना 1000 कोटींची मानहानीची नोटीस पाठविली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, रामदेव बाबा यांनी त्यांच्या कृत्याबद्दल लेखी माफी मागितली पाहिजे.

    मानहानीच्या नोटीसमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने (उत्तरांचल शाखा) लिहिले आहे की, “रामदेव बाबांनी जर स्वत:च्या वक्तव्यांचा विरोध दर्शविणारा व्हिडिओ पोस्ट नाही केला आणि 15 दिवसांत लेखी माफी मागितली नाही तर त्यांना एक हजार कोटी रुपयांची मागणी केली जाईल.”

    एका दिवसापूर्वी आयएमएने आपल्या पत्रात रामदेव बाबांच्या अ‍ॅलोपॅथिक वैद्यकीय व्यवसाय आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांविरुद्ध केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदविला होता. पत्रात असे म्हटले होते की, या महामारीच्या संकटकाळात रामदेव बाबांनी डॉक्टरांच्या कर्तव्याची खिल्ली उडवली. रामदेव बाबांनी जे केले आहे, त्यासाठी त्यांच्याविरुद्ध तत्काळ कडक कारवाई केली जावी. हे पत्र थेट उत्तराखंडचे सीएम तीरथसिंह रावत यांना पाठवण्यात आले.

    दुसरीकडे, रामदेव बाबांनीही इंडियन मेडिकल असोसिएशनला (आयएमए) खुले पत्र देत अ‍ॅलोपॅथीला आव्हानही दिले आहे. रामदेव बाबांनी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि फार्मा कंपन्यांना खुल्या पत्रात 25 प्रश्न विचारले होते.

    IMA 1000 Cr Defamation Notice To Ramdev Baba, Demands written Apology

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    Lawyer Rakesh Kishor Kumar : CJI वर बूट फेकणाऱ्या वकिलाने म्हटले- घडले त्याबद्दल पश्चात्ताप नाही; नशेत नव्हतो, सरन्यायाधीशांच्या देवाबद्दलच्या विधानाने वाईट वाटले

    World Bank : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील; जागतिक बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज 6.5% पर्यंत वाढवला