वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रसिद्ध संगीतकार इलैयराजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्याशी केली आहे. एका नव्या पुस्तकात त्यांनी म्हंटले आहे की, दोघेही आक्रमक व्यक्तिमत्वाचे असून केवळ विचार करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती करण्यावर त्यांचा भर आहे. Ilaiyaraaja compares PM Modi to Ambedkar in new book, calls them ‘striking…
‘आंबेडकर अँड मोदी: रिफॉर्मर्स आयडियाज, परफॉर्मर्स इम्प्लीमेंटेशन’ , असे या पुस्तकाचे नाव आहे. त्याचे प्रकाशन १४ एप्रिल रोजी आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले. ब्लूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
इल्लेयराजा स्वतः दलित आहेत. पुस्तकात ते म्हणातात, डॉ. आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार असून दलितांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनेक समानता आहेत. या दोघांनीही “गरिबी आणि सामाजिक असंतुलन जवळून पाहिले. ते नष्ट करण्याचे काम केले.
दोघांनीही भारतासाठी मोठी स्वप्ने पाहिली. तसेच सामाजातील तळागाळातील दुर्बल लोकांना वर काढण्यात ते यशस्वी झाले. तीन तलाकवर बंदी आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ही योजना पंतप्रधान मोदी यांनी राबविली. मोदी यांनी केलेले कायदे पाहिले तर डॉ. बी.आर. आंबेडकरांना देखील त्याचा अभिमान वाटला असता, असेच आहेत.
मोदींची आंबेडकरांशी तुलना केल्याबद्दल द्रमुक आणि मित्र पक्षांनी इल्लेयराजा यांच्यावर टिका केली आहे. तर भाजपच्या तामिळनाडू युनिटने त्यांचे कौतुक केले. कोणीही इलैयराजा यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूचे माजी भाजप प्रमुख आणि कॅबिनेट मंत्री एल मुरुगन यांनी इलैयराजा यांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की इलैयराजा यांचा दृष्टिकोन द्रमुकला भावाला नाही. राज्यातील सत्ताधारी द्रमुक हा पक्ष “दलितविरोधी आणि संविधानविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपचे राज्य प्रमुख के अन्नामलाई म्हणाले, इल्लेयराजा यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्यातील सरकार करू शकत नाही.
Ilaiyaraaja compares PM Modi to Ambedkar in new book, calls them ‘striking…
महत्त्वाच्या बातम्या
- Sri Lanka Crisis : आयएमएफसोबतच्या कराराला 4 महिने लागतील, तोपर्यंत भारताला अधिक आर्थिक मदतीची मागणी
- Akshay Kumar : पान मसाला कंपनीच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादात, सेन्सॉर बोर्डाच्या माजी प्रमुखांनी केली टीका
- ओवेसींच्या पक्षाचे आझम खान यांना निमंत्रण : AIMIM प्रवक्त्याने पत्रात म्हटले – अखिलेश मुस्लिमांचे हमदर्द नाहीत; तुम्हाला तुरुंगात मरायला सोडले
- Raj Thackeray : ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा अल्टीमेटम, म्हणाले- ‘हिंदूंनी तयार राहावे, 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावे’