• Download App
    कोरोनाची दुसरी लाट केव्हा ओसरणार? केव्हा असेल सर्वाधिक रुग्णसंख्या? IITच्या शास्त्रज्ञांनी दिले हे उत्तर । IIT Scientists Claim that Corona Second Wave Peak  Will Come By May 15

    शास्त्रज्ञांचं भाकीत : कोरोनाची दुसरी लाट केव्हा ओसरणार? सर्वाधिक रुग्णसंख्या केव्हा? IIT शास्त्रज्ञांनी दिले हे उत्तर

    Corona Second Wave Peak  : अवघा देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजतोय. दररोज रुग्णसंख्येचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत आहेत. यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, हा कोरोना जाणार तरी कधी? ही लाट ओसरणार कधी? याच प्रश्नांवर आयआयटी कानपूर तसेच हैदराबादेतील शास्त्रज्ञांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही भाकितं केली आहेत. IIT Scientists Claim that Corona Second Wave Peak  Will Come By May 15


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अवघा देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंजतोय. दररोज रुग्णसंख्येचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित होत आहेत. यामुळे प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, हा कोरोना जाणार तरी कधी? ही लाट ओसरणार कधी? याच प्रश्नांवर आयआयटी कानपूर तसेच हैदराबादेतील शास्त्रज्ञांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही भाकितं केली आहेत.

    शास्त्रज्ञांच्या मते, भारतातील कोरोनाची ही दुसरी लाट 11 ते 15 मेदरम्यान शिखरावर असेल. या कालावधीत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 33 ते 35 लाख असण्याचा अंदाज आहे. सध्या देशात 24.5 लाख सक्रिय रुग्णसंख्या आहे.

    महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती?

    शास्त्रज्ञांच्या मते, दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणामध्ये 25 ते 30 एप्रिलदरम्यान कोरोना रुग्णसंख्येचे विक्रम मोडले जाऊ शकतात. तर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये कोरोना महामारीची सर्वोच्च पातळी यापूर्वीच गाठलेली आहे.

    मे महिन्याच्या अखेरीस दिलासा मिळण्याची शक्यता

    आयआयटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मे अखेरीस कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत झपाट्याने घट होईल. दरम्यान, शुक्रवारी एका दिवसात भारतात 3,32,730 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर 2263 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही 24,28,616 पर्यंत वाढली आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी गणिताच्या मॉडेलच्या आधारे असा अंदाज लावला आहे की, कोरोना ओसरण्यापूर्वी मेच्या मध्यापर्यंत उपचाराधीन रुग्णसंख्येत 10 लाखांची वाढ होऊ शकते.

    कोरोना रुग्णसंख्येत अचानक होईल घट

    आयआयटी कानपूरच्या संगणक विज्ञान विभागातील प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी म्हटले की, 11 ते 15 मेदरम्यान उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढण्याचे तार्किक कारण आहे. ही संख्या 33 ते 35 लाखांपर्यंत असू शकते. ही वेगवान वाढ आहे, परंतु त्याच वेळी नवीन रुग्णांची संख्याही अचानक घटण्याची शक्यता आहे. मेच्या अखेरीस यात आपल्याला नाट्यमय घट पाहायला मिळेल.

    शास्त्रज्ञांनी अद्याप हा शोधनिबंध प्रकाशित केलेला नाही. त्यांचे म्हणणे आहे की, फॉर्म्युला मॉडेलमध्ये अनेक विशेष बाबी आहेत, तर पूर्वीच्या अभ्यासांमध्ये रुग्णांची लक्षण नसलेले आणि संसर्गात विभागलेले होते. नव्या मॉडेलमध्ये हे तथ्यही तपासण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या एका भागाची माहिती संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या तपासणीने अथवा इतर नियमांनी काढता येईल. या महिन्याच्या सुरुवातीला गणितीय मॉडेलच्या माध्यमाने अनुमान लावण्यात आला होता की, देशात 15 एप्रिलपर्यंत संसर्गाचे प्रमाण शिखरावर असेल, परंतु हे मात्र खरे ठरले नाही.

    IIT Scientists Claim that Corona Second Wave Peak  Will Come By May 15

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य