विशेष प्रतिनिधी
जोधपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूरमधील 2021-22 सालचा प्लेसमेंट ड्राइव्ह सुरू झाले आहे. आतापर्यंत 40 कंपन्यांनी या ड्राईव्हसाठी नोंदणी केलेली आहे. डिसेंबर 2021 पर्यंत दोन टप्प्यांमध्ये ड्राईव्ह घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 128 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.
IIT Jodhpur Placement 2021-22: Rs. 24.38 lakhs per annum. Average package
2020-21 मध्ये बीटेकच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणारे अॅव्हरेज पॅकेज होते रू. 14.36 LPA. पण यावर्षी अॅव्हरेज पॅकेज रु. 24.38 LPA इतके ऑफर करण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी जोधपूरसाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे.
प्लेसमेंट सेल हेड डॉ. अनुज पाल कपूर यांनी आपल्या मुलाखतींमध्ये सांगितले, प्रशासनाकडून आणि प्राध्यापकांकडून मिळालेले सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांची मुलाखतीमधील कामगिरी या गोष्टी ह्या यशासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. प्लेसमेंटच्या दोन टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यांमध्ये जवळपास 55 टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होऊन जाते.
आयआयटी जोधपूरमध्ये आत्तापर्यंत चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली आहे. या ऑफर एसएमएस डेटा टेक, डायव्हर्टा आणि ओत्सुका होल्डिंग या कंपन्यांनी दिलेल्या आहेत.
PPO ऑफर करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये DE शॉ, Arcesium, Microsoft, Morgan Stanley, Gojek, Amazon, Adobe, Codenation, SMS Data Tech, Diverta, Otsuka, Exawizard, Goldman sachs आणि Google या कंपन्यांचा समावेश आहे.
अनेक नामवंत कंपन्या या वर्षी प्रथमच आयआयटी जोधपूरमध्ये येत आहेत. यामध्ये Google, Graviton Trading, Zomato, Paytm, Deloitte, American Express, IBM, Infenion, Bukukas, Park Plus, Housing.com, Increff, Tata Electronics आणि Tide यांचा समावेश आहे.
IIT Jodhpur Placement 2021-22: Rs. 24.38 lakhs per annum. Average package
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान