• Download App
    आठ वर्षांनंतरही पक्षाच्या अध:पतनाची कारणे समजत नसतील तर...कपील सिब्बल यांनी केली गांधी कुटुंबियांना हटविण्याची मागणी|If you do not understand the reasons for the decline of the party even after eight years ... Kapil Sibal demands resignation l of Gandhi family

    आठ वर्षांनंतरही पक्षाच्या अध:पतनाची कारणे समजत नसतील तर…कपील सिब्बल यांनी केली गांधी कुटुंबियांना हटविण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आठ वर्षांनंतरही तुम्हाला पक्षाच्या अध:पतनाची कारणे समजत नसतील तर तुम्ही संकटात वाळूत चोच खूपसून बसलेल्या पक्षासारखे आहेत. कॉँग्रेस वर्कींग कमीटी म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे, असे म्हणत गांधी कुटुंबियांनी आता पक्षाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपील सिब्बल यांनी केली आहे. तुम्हीच बनविलेली कॉँग्रेस वर्कींग कमीटी तुम्हाला जा म्हणणार नाही. त्यामुळेच तुम्हीच मानाने जा, असे आवाहनही सिब्बल यांनी केले आहे.If you do not understand the reasons for the decline of the party even after eight years … Kapil Sibal demands resignation l of Gandhi family

    इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सिब्बल बोलत होते. कॉँग्रेसमध्ये व्यापक बदल घडावा आणि पक्षाच्या नेतृत्वात बदल व्हावा अशी मागणी करणाºया जी-२३ गटाचे ते प्रमुख नेते आहेत. सिब्बल म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतरही अनेक नेते सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहेत.



     

    कॉँग्रेस वर्कींग कमीटीच्या निर्णयाचे तर मला आश्चर्य वाटते. पण या कमीटीतील नेते म्हणजे खरी कॉँग्रेस नव्हे. त्यांच्याशिवाय मोठ्या संख्येने कॉँग्रेसजन आहेत. या सर्वांची हिच भावना आहे की आता गांधी कुटुंबाने पक्षातून बाहेर जावे.सिब्बल म्हणाले, पाच राज्यांतील निवडणूक निकालांचे मला आश्चर्य वाटलेले नाही. याचे कारण म्हणजे २०१४ पासूनच पक्षाला लागलेली उतरती कळा पाहत आहे.

    आम्ही एकापाठोपाठ एक राज्य गमावत चाललो आहोत. आम्ही जिथे यशस्वी झालो तेथेही आमच्या नेत्यांना एकत्र ठेवू शकलो नाही. ज्यांच्याकडून नेतृत्वाच्या अपेक्षा होत्या त्या लोकांनी पक्ष सोडला. 2022 च्या विधानसभा निवडणुकीतही नेतृत्वाच्या जवळचे लोक त्यांना सोडून गेले. मी आकडे बघत होतो. 2014 पासून सुमारे 177 खासदार आणि आमदार आणि 222 उमेदवारांनी काँग्रेस सोडली. इतर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये हा प्रकार आजपर्यंत घडलेला नाही.

    पक्षाच्या पराभवावर चिंतन शिबिर घेण्याच्या सोनिया गांधी यांच्या निर्णयाची खिल्ली उडविताना सिब्बल म्हणाले, आठ वर्षांत अनेक पराभव होतात. पक्षाचे अध:पतन होत आहे हे स्पष्ट दिसत आहे. तरीही तुम्ही चिंतन शिबिरे कसली घेता? कॉँग्रेस वर्कींग कमीटीतील अनेकांना वाटते की गांधी कुटुंबाशिवाय कॉँग्रेस टिकू शकणार नाही

    कदाचित अनेकांचे हे प्रामाणिक मतही असेल. मात्र, त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की आत्ता जे चालू आहे तेच चालू राहिले तर तसेची आम्ही टिकणार नाही.राहूल गांधी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी यावेत का या प्रश्नावर ते म्हणाले की, राहूल गांधीच सध्या पडद्यामागून कॉँग्रेस चालवित आहेत. तसे नसेल तर पंजाबमध्ये जाऊन चरणजित सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती त्यांनी कोणत्या अधिकारात केली. जर पडद्यामागून तेच कॉँग्रेस चालवित होते तर आता प्रत्यक्ष अध्यक्षपदावर येऊन असा काय फरक पडणार आहे?

    आपण जी-२३ या गटाच्या वतीने बोलत नसून एक सच्चा कॉँग्रेसजन म्हणून बोलत आहोत. कॉँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार या जन्मातही करणार नाही. मेलो तरी भारतीय जनता पक्षात जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

    If you do not understand the reasons for the decline of the party even after eight years … Kapil Sibal demands resignation l of Gandhi family

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य