• Download App
    वार-पलटवार : आमची वायनरी असेल तर त्यांनी ती ताब्यात घ्यावी, भाजप नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचे किरीट सोमय्यांना आव्हान । If we have a winery, they should take possession of it, Sanjay Raut challenges Kirit Somaiya

    वार-पलटवार : आमची वायनरी असेल तर त्यांनी ती ताब्यात घ्यावी, भाजप नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचे किरीट सोमय्यांना आव्हान

    भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाईन व्यावसायिकाच्या कंपनीत पार्टनरशिप असल्याचा आरोप केला आहे. यावर गोवा दौऱ्यावर आलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, सोमय्या म्हणतात त्याप्रमाणे आमची वायनरी असेल तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी. त्यांनी ती चालवावी!” If we have a winery, they should take possession of it, Sanjay Raut challenges Kirit Somaiya


    वृत्तसंस्था

    पणजी : भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाईन व्यावसायिकाच्या कंपनीत पार्टनरशिप असल्याचा आरोप केला आहे. यावर गोवा दौऱ्यावर आलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, सोमय्या म्हणतात त्याप्रमाणे आमची वायनरी असेल तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी. त्यांनी ती चालवावी!”

    संजय राऊत पुढे म्हणाले की, एखाद्याने एखाद्या कंपनीत संचालक असणं गुन्हा आहे का? बँकांना लुबाडणं आणि चोऱ्या करण्यापेक्षा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने कष्ट करणं आणि काम करणं चागंल आहे ना. व्यवसाय करण गुन्हा आहे का? असा सवालही त्यांनी केला. अशोग गर्ग यांना आपण ओळखतो आणि ते माझे चांगले मित्र आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

    राऊत पुढे म्हणाले की, भाजपचे लोक केळी विकतात का? अमित शहांचा मुलगा केळी, संफरचंद विकतो का? कुणाची मुलं काय करतात, हे कशाला बघता? भाजपने घारणेरडं राजकारण थांबवावं. तुमची मुलं काय करतात ते बघा. आमची मुलं ड्रग्ज विकत नाहीत किंवा तुमच्या मुलांसारखी ड्रग्जच्या आहारी गेलेली नाहीत, असा टोलाही राऊतांनी लगावला.



    उत्पल पर्रीकरांबाबतच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, पणजीमध्ये अपक्ष लढत असलेल्या उत्पल पर्रीकर यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरलाय. त्यामुळे आमच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेऊ. भाजपविरोधात लढत असलेल्या उत्पल पर्रीकर यांच्यासाठी आम्ही प्रचार करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    तत्पूर्वी, सोमय्या पुढे म्हणाले की, ”अशोक गर्ग यांच्या मॅगपी ग्लोबल लिमिटेड या कंपनीत राऊत यांची पार्टनरशीप आहे. त्यांचा हॉटेल, पब, क्लब आणि काही ठिकाणी वाईन वितरीत करण्याचा व्यवसाय आहे. 16 एप्रिल 2021 रोजी राऊत कुटुंबीयांनी मॅगपीसोबत करारावर सह्या केल्या. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत.” आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषदेत शिवसेना नेत्याशी संबंधित कागदपत्रे जाहीर करणार असल्याचं सोमय्यांनी ट्वीट केलं आहे.

    सोमय्या यांनी आरोप करताना म्हटले की, ”मॅगपी कंपनीचे मूळ नाव मादक प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. या कंपनीची उलाढाल वार्षिक 100 कोटींची आहे. कंपनीने 2 जानेवारी रोजी या कंपनीचा मुख्य व्यवसाय वाईन वितरीत करण्याचा असल्याचे शासनाला कळवले. त्यानंतर राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाइन ठेवण्याचा निर्णय घेतला. मी थेट आरोप करतोय, पण उत्तर कोणी देत नाही, असेही ते म्हणाले.

    If we have a winery, they should take possession of it, Sanjay Raut challenges Kirit Somaiya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य