• Download App
    तृणमूलच्या नेत्यांना भाजपामध्ये घेतले नसते तर चांगली कामगिरी झाली असती, वरिष्ठ नेत्यांची चूक झाली, भाजपा आमदाराची खंत|If Trinamool leaders had not been included in BJP, it would have been a good performance, senior leaders made a mistake, BJP MLA laments

    तृणमूलच्या नेत्यांना भाजपामध्ये घेतले नसते तर चांगली कामगिरी झाली असती, वरिष्ठ नेत्यांची चूक झाली, भाजपा आमदाराची खंत

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉँग्रेसच्या अनेक नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला गेला. चार महिन्यांत भाजपचे चार आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये परतले आहे. यावर भाजपाचे कूचबिहार दक्षिणचे आमदार निखिल रंजन डे यांनी म्हटले आहे की तृणमूल नेत्यांना भाजपमध्ये समाविष्ट करून घेणे ही वरिष्ठ नेत्यांची चूक झाली आहे.If Trinamool leaders had not been included in BJP, it would have been a good performance, senior leaders made a mistake, BJP MLA laments

    त्यांना पक्षात घेतले नसते तर पक्षाची कामगिरी चांगली झाली असती.निखिल डे म्हणाले तृणमूलच्या नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश देऊन नेत्यांनी चूक केली. बाहेरून आलेले हे नेते कधीही भाजपाच्या विचारसरणीशी एकरुप झाले नव्हते. भाजपच सत्तेवर येईल असा समज झाल्यानचे ते पक्षात आले होते. आमच्या पक्षाने त्यांना खूप महत्त्व दिले होते. आता ते निघून जात आहेत.

    भाजपचे उपाध्यक्ष मुकुल रॉय भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी मे महिन्यात तृणमूलमध्ये परतले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे आणखी तीन आमदार तृणमूलमध्ये गेले आहेत. .
    डे यांच्यावर टीका करताना तृणमूल कॉँग्रेसचे कूचबिहारचे जिल्हाध्यक्ष पार्थ प्रतिमा रॉय म्हणाले,

    त्यांच्या तर्काने विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे देखील भाजपच्या विचारसरणीशी एकरूप झालेले नाहीत. कारण ते एक वषार्पूर्वी तृणमूलसोबत होते.

    If Trinamool leaders had not been included in BJP, it would have been a good performance, senior leaders made a mistake, BJP MLA laments

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य