• Download App
    कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा|If someone threatens us, we will not live without teaching a lesson, warns Defense Minister Rajnath Singh

    कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : भारत हा आक्रमणकारी आणि विस्तारवादी मानसिकतेचा देश नाही. सर्व शेजाऱ्यांसोबत शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यावर आम्ही नेहमीच भर दिला आहे. मात्र, कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी अप्रत्यक्षपणे चीनला दिला आहे.If someone threatens us, we will not live without teaching a lesson, warns Defense Minister Rajnath Singh

    लडाख दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात जवान व अधिकाऱ्यांशी चर्चा करताना ते बोलत होते. शांतता आणि चर्चा हाच कोणत्याही वादावर तोडगा काढण्याचा एकमेव पर्याय आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्हाला कुणाची एक इंचही भूमी नको, पण राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



    शांतता आणि प्रेम हेच भारताचे धोरण आहे. आजपर्यंत आम्ही कोणत्याही देशाला डिवचले नाही आणि धमकीही दिली नाही. इतर देशांनीही शांततेचाच मार्ग स्वीकारावा, अशी आमची इच्छा आहे.

    आमच्या शांततेला कमजोरी समजणाऱ्यांनी मागील वर्षी गलवान खोऱ्यात नको ते धाडस दाखविले होते, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. कोणत्याही आकस्मिक संकट आणि आव्हानाचा सामना करण्यासाठी आमचे जवान किती सज्ज आहेत, याची प्रचीती त्यांना आली, असा संदेश राजनाथसिंह यांनी दिला.

    आपण आजचे शेजारी नाही, तर मागील कित्येक शतकांपासून शेजारी आहोत, याचा विचार करायला हवा. दुसºयांया भूमीवर डोळा ठेवून आक्रमण करणे शेजाऱ्यां चे धोरण असायला नको. इतरांची जमीन हडपण्यासाठी आम्ही कधीच कुणावर आक्रमण केले नाही.आमचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.राजनाथसिंह यांनी मागील वर्षी 15 जूनच्या मध्यरात्री गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्या 20 जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

    If someone threatens us, we will not live without teaching a lesson, warns Defense Minister Rajnath Singh

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य