• Download App
    गेल्या सत्तर वर्षांत वैद्यकीय सेवा मजबूत झाली असती तर तुम्हाला युक्रेनला शिकण्यासाठी जावेच लागले नसते, पंतप्रधानांनी साधला युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद|If medical services had been stronger in the last 70 years, you would not have had to go to Ukraine to study, says PM

    गेल्या सत्तर वर्षांत वैद्यकीय सेवा मजबूत झाली असती तर तुम्हाला युक्रेनला शिकण्यासाठी जावेच लागले नसते, पंतप्रधानांनी साधला युक्रेनहून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद

    विशेष प्रतिनिधी

    वाराणसी : गेल्या सत्तर वर्षांत वैद्यकीय सेवा मजबूत झाली असती तर तुम्हाला शिकण्यासाठी युक्रेनला जावेच लागले नसते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले. वाराणसी येथे युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची पंतप्रधानांनी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांचे युक्रेनचे अनुभव सांगितले.If medical services had been stronger in the last 70 years, you would not have had to go to Ukraine to study, says PM

    पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने संवाद साधला. युक्रेनमध्ये अडकलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा अंतर्गत विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढवण्यात आल्यापासून एकूण १७,००० भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडले आहे.



    पंतप्रधान म्हणाले, आपला देश मजबूत होणे हाच या सर्व समस्यांवर उपाय आहे. देशात आधीपासून वैद्यकीय शिक्षणाबाबत धोरण योग्य असते तर दुसऱ्या  देशात जावे लागले नसते. कोणत्याही पालकांना आपल्या मुलांना एकटे दुसºया देशात पाठवावे असे वाटत नाही. आधीच्या काळात ३०० ते ४०० वैद्यकीय महाविद्यालये होती.

    आता आपण ७०० महाविद्यालयापर्यंत पोहोचलो आहोत. खाजगी महाविद्यालयेही दुप्पट झाली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे हा माझा प्रयत्न आहे. आम्ही जे प्रयत्न करोत आहोत त्यानुसार गेल्या ७० वर्षात जेवढे डॉक्टर बनले आहेत ते येत्या १० वर्षात तयार होतील.

    भारतीयांना बाहेर काढण्यासाठी, सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत ८० उड्डाणे तैनात केली आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, सरकारने कोणत्याही अडथळ्याशिवाय निर्वासन मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान या मुद्द्यावर महत्त्वाच्या बैठका घेत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी, मॉस्कोने युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क या प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिल्यानंतर तीन दिवसांनी, रशियन सैन्याने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली होती.

    If medical services had been stronger in the last 70 years, you would not have had to go to Ukraine to study, says PM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य