वृत्तसंस्था
हैदराबाद : देशभरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने कुठेही छापा घालून गांजा पकडला की त्याची पाळेमुळे आंध्र प्रदेशमध्ये कशी काय सापडतात?, आंध्रच्या वायएसआर काँग्रेसच्या सरकारने ढिलाई दाखवल्यामुळे आंध्र प्रदेशात गांजाची शेती फैलावली आहे, असा गंभीर आरोप तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. If cannabis is seized anywhere in the country, how can it be found in Andhra Pradesh ?; Chandrababu’s attack after a long time
बर्याच दिवसांनी चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेश आणि देशाच्या राजकीय पटलावर पुन्हा दिसायला लागले आहेत. आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाच्या काही कार्यालयांवर हल्ले झाले. त्यांचा तीव्र निषेध चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्याच वेळी त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे, तो म्हणजे आंध्र प्रदेशात सुमारे 25 हजार हेक्टर परिसरात गांजाची लागवड करण्यात आली आहे याची किंमत तब्बल 8 हजार कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या सरकारने ड्रग्ज माफियांना मोकळे रान मोकळे सोङले आहे. त्यामुळे गांजाची आंध्रमध्ये बिनदिक्कतपणे बहरती आहे, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.
देशामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अनेक ठिकाणी छापे घालते आहे. मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करते आहे. पण सगळ्या सापडलेल्या गांजाची पाळेमूळे आंध्र प्रदेशमध्ये कशी काय सापडतात?, असा खोचक सवाल चंद्राबाबू नायडू यांनी करून मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांना घेरले आहे.
आंध्र प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. तेलुगु देशम कार्यालयांवर झालेले हल्ले या किरकोळ घटना नाहीत. आंध्रच्या प्रशासनावर सरकारचे नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे आंध्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.
If cannabis is seized anywhere in the country, how can it be found in Andhra Pradesh ?; Chandrababu’s attack after a long time
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू करणार, ‘ट्रुथ सोशल’ असणार नाव
- नवाब मलिकांचे जस्मिन वानखेडे यांच्यावर आरोप , मनसे झाली आक्रमक
- Farmers Protest : गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी केला खुला, राकेश टिकैत म्हणाले – आम्ही बंदच कधी केला होता!
- NCB Raid : अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा, आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर
- भारताच्या 100 कोटी लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून विशेष दखल
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २५ तारखेपासून व्यापक लसीकरण मोहीम ; उदय सामंत यांची घोषणा, दिल्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना