• Download App
    कोरोनाची तिसरी लाट भारतात उशीरा येईल; आयसीएमआरचा खुलासा;देशात रोज १ कोटी लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य आवश्यक ICMR has come up with a study which says 3rd wave is likely to come late. We've window period of 6-8 months to immunise everybody in country

    कोरोनाची तिसरी लाट भारतात उशीरा येईल; आयसीएमआरचा खुलासा;देशात रोज १ कोटी लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य आवश्यक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – कोरोनाची तिसरी भारतात येईल. पण आधी वर्तविल्याप्रमाणे ती लवकर न येता, उशीरा येईल. असा निरीक्षण आयसीएमआरच्या अभ्यासातून नोंदविण्यात आले आहे. ICMR has come up with a study which says 3rd wave is likely to come late. We’ve window period of 6-8 months to immunise everybody in country

    या अभ्यासाबाबत कोविड वर्किंग ग्रुपचे चेअरमन डॉ. एन के अरोडा यांनी माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, भारताला ६ ते ८ महिन्यांचा वेळ आहे. ज्यामध्ये सर्व लोकांच्या लसीकरणावर फोकस असला पाहिजे. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये दररोज एक कोटी लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवणे गरजेचे आहे. त्यांनी म्हटले की, Zydus Cadila लसीचे ट्रायल जवळपास पूर्ण झाले आहे. जुलैच्या अखेरपर्यंत १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांना आपण लसीचे डोस देऊ शकतो.

    शाळा नक्की सुरू होणार तरी कधी? या प्रश्नाचे उत्तर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की लहान मुलांचे लसीकरण झाल्यानंतरच शाळा सुरू होण्याच्या शक्यता आहे.

    भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे दुसऱ्या तसेच तिसऱ्या चाचणीचे परिक्षण सप्टेंबर पर्यंत येण्याची शक्यता आहे. ड्रग कंन्ट्रोलर च्या मंजूरी नंतर लहान मुलांसाठी लसीचे डोस उपलब्ध होऊ शकतील, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले.

    ICMR has come up with a study which says 3rd wave is likely to come late. We’ve window period of 6-8 months to immunise everybody in country

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये