विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – आईस्क्रीमवर आता भरभक्कम कर भरावा लागणार असल्याची माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने दिली. त्यामुळे आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आईस्क्रीम खाण्याऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आईस्क्रीम विक्रीवर १८ टक्के जीएसटी लागणार आहे.Billionaire will became richer
सीबीआयसीने परिपत्रकाच्या दोन विभागात २१ वस्तू आणि सेवांसंबंधित दरांमध्ये बदलांवर व्यापार आणि उद्योगांद्वारे उचलण्यात आलेल्या मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आईस्क्रीम पार्लरबद्दल सीबीआयसीने भूमिका मांडली की, आईस्क्रीम पार्लर तयार आईस्क्रीम विकतात, त्या रेस्टॉरेंटसारखे नसतात.
परिपत्रकानुसार आईस्क्रीम पार्लरचा कोणत्याही स्तरावर खाद्यपदार्थ तयार करण्याशी संलग्न नाहीत. मात्र, रेस्टॉरेंट सेवा देण्याबरोबरच खाद्यपदार्थ तयार करणे अशीही कामे करतात. सीबीआयसीने भूमिका मांडताना स्पष्ट केले की, आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम तयार स्वरूपात असते.
ती नव्याने तयार केली जात नाही. त्यामुळे त्यावर १८ टक्के दराने जीएसटी लागू होईल. पहिल्या काही प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले होते की आईस्क्रीम पार्लरमध्ये विकली जाणारी आईस्क्रीम रेस्टॉरंट सेवेअंतर्गत घेतली जाईल,
त्यामुळे त्यावर ५ टक्के जीएसटी दर लावला जाईल. मात्र, आता परिपत्रकात तरतूद करण्यात आली आहे की, आईस्क्रीम पार्लर तयार स्वरूपातील आईस्क्रीम विकतात, त्यामुळे त्यांना रेस्टॉरेंटसाठी लागू कर होत नाही.
Billionaire will became richer
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल