विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुलगी म्हणजे परक्याचे धन असे म्हटले जाते. मात्र, या परंपरेला एका आयएएस तरुणीने नाकारले आणि लग्नात कन्यादानाला नकार दिला. तुमची मुलगी आहे आणि तुमचीच राहिल असेही त्यांनी म्हटले.IAS officer daudghter rejects Kanyadan tradition , said to father I am your daughter forever
आयएएस अधिकारी तपस्या परिहार यांचा नुकताच विवाह झाला. २०१८ मध्ये त्यांनी आयएएस सेवेत प्रवेश केला होता. आयएफएस अधिकारी असलेले गरवित गंगवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र, तपस्याने आपले वडील वडील विश्वास परिहार यांना कन्यादान देण्यापासून रोखले.
तपस्या वडिलांना म्हणाली ‘पापा, मी तुमची मुलगी आहे आणि नेहमीच राहीन. जेव्हा दोन कुटुंबे एकत्र येतात, तेव्हा दानधमार्ची चर्चा नको. हे ऐकून वडिलांनी तपस्याला मिठी मारली.हिंदू संस्कृतीत कन्यादानाला स्वत:चे विशेष महत्त्व असल्याचं म्हटलं जातं, मात्र नरसिंगपूर जिल्ह्यात जन्मलेल्या तपस्या परिहार यांनी ही परंपरा मोडीत काढली. कुटुंबीयांनीही त्याला साथ दिली. त्यामुळे हे लग्न सध्या चर्चेत आहे.
यावेळी तपस्या म्हणाली की लहानपणापासून मला समाजाच्या या विचारसरणीबद्दल प्रश्न पडला होता. माझे कन्यादान कोणी कसे करू शकते, ते ही माझ्या इच्छेशिवाय. हळुहळू मी माझ्या घरच्यांशी त्याच गोष्टीवर चर्चा केली. घरच्यांनीही या गोष्टीवर सहमती दर्शवली. जेव्हा दोन कुटुंबं एकत्र लग्न करतात, तेव्हा लहान-मोठं किंवा उच्च-नीच असणं योग्य नाही. दान का? मी लग्नासाठी तयार झाल्यावर घरच्यांशी चर्चा करून कन्यादानाचा सोहळाही लग्नापासून दूर ठेवला.
ओशो भक्त असलेले तपस्याचे वडील विश्वास परिहार म्हणतात की मुलगा आणि मुलगी यात फरक नसावा. दान देऊन मुलींना त्यांचे हक्क आणि संपत्तीपासून वंचित ठेवता येत नाही. कायदा मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक परंपरा चुकीच्या आहेत. मुलीला दान देऊन तिचा हक्क हिरावून घेतो.
तपस्याचे पती गरवित म्हणाले की लग्नानंतर मुलीने पूर्णपणे का बदलले पाहिजे. मग ती मागणी भरून काढण्याचा विषय असो की मुलगी विवाहित असल्याचे सिद्ध करणारी कोणतीही परंपरा असो. तर मुलासाठी हे कधीही लागू होत नाही आणि आपण अशा समजुती हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
IAS officer daudghter rejects Kanyadan tradition , said to father I am your daughter forever
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडे यांची मुदत 31 डिसेंबरला संपणार; मुदतवाढ मागितली नाही; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची माहिती
- मुलींनी प्रजनन क्षमतेच्या वयात लग्न करणे उत्तम ; समाजवादी पार्टी नेते हसन
- एन्जॉय द रेप; काँग्रेस आमदार रमेश यांना प्रियांका गांधी यांनी झापले पण कायदेशीर किंवा पक्षीय कारवाईचे काय??
- 2020-21 मध्ये पहिल्या 7 महिन्यातच भारताच्या तांदूळ निर्यातीत वाढ