Monday, 5 May 2025
  • Download App
    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी जवानांचा रात्रभर लढा; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आसाममधून “मॉनिटरींग”; आज संध्याकाळी ते छत्तीसगडला जाणार|I received a call from HM Amit Shah. He has sent CRPF DG to the state. I'll return to Chhattisgarh in the evening: Chhattisgarh CM bhupesh baghel in Guwahati

    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी जवानांचा रात्रभर लढा; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आसाममधून “मॉनिटरींग”; आज संध्याकाळी ते छत्तीसगडला जाणार

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी :  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीच्या बातम्या आणि मोठ्या हानीच्या बातम्या काल दुपापपासून येताहेत. २१ जवान शहीद झाले आहेत. आणि मुख्यमंत्री साधारण तासाभरापूर्वीपर्यंत आसाममधून परिस्थितीचे “मॉनिटरिंग” करीत आहेत. त्यांनी गुवाहाटीतून एएनआय वृत्तसंस्थेच्या बातमीदाराला बाईट दिला.I received a call from HM Amit Shah. He has sent CRPF DG to the state. I’ll return to Chhattisgarh in the evening: Chhattisgarh CM bhupesh baghel in Guwahati

    तिकडे नक्षलवादी – जवानांची चकमक छत्तीसगड़च्या सुकूमा भागात सुरू होती आणि इकडे आसाममध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचे प्रभारी म्हणून प्रचाराचे नियोजन करीत होते. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे भूपेश बघेल यांनी गुवाहाटीतून पत्रकारांना सांगितले.



    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कॉल मला आला. त्यांनी सीआरपीएफच्या डीजींना छत्तीसगडमध्ये पाठविले आहे. आपण स्वतः संध्याकाळी छत्तीसगडला जाणार आहोत. ही माहिती भूपेश बघेल यांनी दिली. याचा अर्थ चकमकीची बातमी आल्यापासून साधारण २४ तास मुख्यमंत्री भूपेश बघेल हे स्वतःचे राज्य छत्तीसगडच्या बाहेरच आहेत.

    तत्पूर्वी, नक्षलग्रस्त विजापूर आणि छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 22 जवान शहीद झाल्याची बातमी आहे. शनिवारी बस्तर भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर काही सैनिक बेपत्ता होते,

    पण शोधमोहिमेदरम्यान चकमकीच्या ठिकाणी आणखी मृतदेह सापडले. यानंतर एकूण 22 जवान शहीद झाल्याची माहिती बिजनौरच्या एसपींनी दिली. दुसरीकडे, 30 जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    वृत्तसंस्था एएनआयनुसार छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर 21 जवान बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरू होता. पोलिस दलाने सांगितले होते की, सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून महिला नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. चकमकीत ९ नक्षलवादी ठार झाले आहेत. याखेरीज नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाल्याची बातमी आहे.

    I received a call from HM Amit Shah. He has sent CRPF DG to the state. I’ll return to Chhattisgarh in the evening: Chhattisgarh CM bhupesh baghel in Guwahati

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!

    Icon News Hub