वृत्तसंस्था
कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूळ काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयानंतर तेथे तृणमूळच्या गुंडांनी घडविलेल्या हिंसाचाराची तुलना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराशी केली आहे. I had heard of such incidents during India’s partition. We had never seen such intolerance after the results of a poll, in independent India: BJP national president JP Nadda, in Kolkata
हिंसाग्रस्त बंगालच्या दौऱ्यावर कोलकात्यात दाखल झाल्यावर त्यांनी तृणमूळच्या गुंडांनी घडविलेल्या हिंसाचाराचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. नड्डा म्हणाले, की आम्ही पूर्वी ऐकले आहे, की भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळी असा भयानक हिंसाचार झाला होता. स्वतंत्र भारतात प्रथमच राजकीय वैरातून एवढी टोकाची द्वेषभावना दिसते आहे. एवढी असहिष्णूता भारतातल्या अन्य प्रांतांमध्ये दिसलेली नाही.
बंगालमध्ये तृणमूळच्या विजयाबरोबर मुस्लीम बहुल ७ जिल्ह्यांमध्ये लूटालूट, हल्ले, जाळपोळ सुरू झाले. भाजपची कार्यालये, उमेदवार, कार्यकर्ते यांना ठरवून वेचून टार्गेट करण्यात आले. बीरभूम, गोपालपूर, दक्षिण २४ परगणा, मिदनापूर येथे हिंसाचार भडकल्याच्या बातम्या आल्या आहेत. जिल्ह्यातील गोपालनगरमध्ये भाजपचे पोलिंग एजंट दास यांच्या घरावर गुंडांनी हल्ला केला. त्याची माहिती त्यांची पत्नी शेफाली दास यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली.
ममता बॅनर्जी उद्या ५ तारखेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत तृणमूळच्या गुंडांना हिंसाचारासाठी मोकळे रान करून देण्यात आले आहे, असा गंभीर आरोप स्वपन दासगुप्ता यांनी केला आहे.
जे. पी. नड्डा हे २४ परगणा जिल्ह्यापासून बंगाल दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. ते भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटतील. त्यांना लढण्यासाठी धीर देतील. तसेच ज्या भाजप कार्यकर्त्यांनी आपला जीव हिंसाचारात गमावला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना भेटून मदतीचा हात देतील.
बीरभूमध्ये हजारो कुटुंबे भीतीने रस्त्यावर
भाजपला निवडणुकीत मदत केल्याच्या आरोपावरून तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी पश्चिम बीरभूम जिल्ह्यातील नन्नूर गावात प्रचंड हिंसाचार केला आहे. हजारो हिंदू कुटुंबे भीतीने रस्त्यावर येऊन बसली असल्याचे चित्र आहे. तृणमूळचे गुंड त्यातील महिलांची छेडछाड करीत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने केंद्रीय सुरक्षा दलांना या भागात पाठवावे, अशी मागणी सपन दासगुप्ता यांनी केली आहे.
तर भाजपच्या दोन महिला निवडणूक एजंटवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे ट्विट दीप हलधर यांनी केले आहे. तृणमूळच्या खासदार महुआ मोईत्रांना मात्र नवी दिल्लीच्या निवडणूक आयोगाचे कार्यालय लोकशाहीची स्मशानभूमी झाल्याचे वाटत आहे. मात्र, अख्खा पश्चिम बंगाल हिंदूंसाठी स्मशानभूमी झाल्याची महुआंना अजिबात खंत वाटत नाही.+
सपन दासगुप्ता यांनी या भीषण घटनेचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. येथील परिस्थितीचे वर्णन करताना ते म्हणाले, हजारो हिंदू कुटुंबे हल्याच्या भीतीने रस्त्यावर येऊन बसली आहेत. त्यांच्यातील महिलांची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. शेकडो गुंड त्यांची छेडछाड करीत आहेत. बंगालचे पोलीस त्यांना रोखतही नाहीत. त्यामुळे केंद्राने आपल्या सुरक्षा दलांना पाठवावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच हिंसाचार सुरू झाला आहे. ज्या गावांनी तृणमूल कॉँग्रेसला विरोध केल्याचा संशय आहे, तेथे हिंसाचार सुरू करण्यात आला आहे. यात आत्तापर्यंत ठार झालेल्यांचा अधिकृत आकडा ९ आहे. यामध्ये प्रामुख्याने हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे