• Download App
    पाकिस्तानातील वैद्यकीय जागांची गरीब विद्यार्थ्यांना विक्री केल्याचा आरोप हुरियत कॉन्फरन्सने फेटाळला Huriyat conference clears its stand on medical issue

    पाकिस्तानातील वैद्यकीय जागांची गरीब विद्यार्थ्यांना विक्री केल्याचा आरोप हुरियत कॉन्फरन्सने फेटाळला

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – पाकिस्तानातील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागांची विक्री करून मिळालेला निधी काश्मिरमधील दहशतवादी कारवायांसाठी पुरविल्याचा आरोप हुरियत कॉन्फरन्सने फेटाळला. हुरियत नेते मिरवैझ उमर फारुक यांनी याबाबत निवेदन जारी केले आहे. Huriyat conference clears its stand on medical issue

    यात त्यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानातील वैद्यकीय व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी काश्मिरी विद्यार्थ्यांकडून हुरियतच्या नेत्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले होते. मात्र, हुरियत हा आरोप पूर्णपणे फेटाळत आहे.

    याआधी, रविवारी (ता. २२) बेकायदा कृत्ये (प्रतिबंधक) कायद्यानुसार हुरियतच्या गटांवर बंदी घातली जाण्याची शक्यता असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांकडून पाकिस्तानातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी हुरियतच्या गटांकडून पैसे घेतले जात असून, ही रक्कम जम्मू आणि काश्मिरातील दहशतवादी कारवायांसाठी पुरविली जात असल्याचे नुकत्याच केलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

    Huriyat conference clears its stand on medical issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; वैद्यकीय कारणास्तव पदत्याग

    Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर सरकारने म्हटले- घाईत निष्कर्ष नको; अंतिम तपास अहवालाची प्रतीक्षा करा

    CM Yogi : सीएम योगी म्हणाले- कावडियांच्या वेशात बदमाश लपलेत, त्यांचा पर्दाफाश करू