• Download App
    न्यूयॉर्क, न्यूजर्सीला चक्रीवादळाचा मोठा फटका; तब्बल दीड लाख घरांतील वीज गायब । Huge loss due to cyclone in USA

    न्यूयॉर्क, न्यूजर्सीला चक्रीवादळाचा मोठा फटका; तब्बल दीड लाख घरांतील वीज गायब

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी राज्यात इदा चक्रीवादळामुळे हाहा:कार माजवला आहे. दोन्ही राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दीड लाखाहून अधिक घरांची बत्ती गुल झाली आहे. Huge loss due to cyclone in USA

    अमेरिकेला वादळे नवीन नाहीत. त्यामुळे वादळाशी मुकाबला करण्यासाठी तेथे आपत्कालीन यंत्रणा नेहमी सज्ज असते. मात्र यावेळची परिस्थीती थोडी भिषण असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.



    न्यूयॉर्क शहरात एकाच कुटुंबातील चौघांचा बुडून मृत्यू झाला. ते तळाघरात फसले होते आणि त्यांना बाहेर येता आले नाही. या शहरात एका तासात ३.२४ इंच पाऊस झाल्यानंतर विमानतळावर पाणी साचले आहे. न्यूयॉर्कच्या नेव्हार्क लिबर्टी विमानतळावरची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
    पेसिल्वेनिया येथे एक लाख घराची तर न्यूजर्सीच्या ५० हजार घरातील वीज गुल झाली. फिलाडेफ्लिया आणि उत्तर न्यू जर्सीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    Huge loss due to cyclone in USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट