राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा.खेत्रपाल मैदानावर संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे ६१ वर्षीय नाैदल प्रमुख अॅडमिरल करंबीरसिंग लांबा यांची विद्यार्थ्यांसह धमाल. तरुण कॅडेट्ससह पुश अप्सची स्पर्धा #FitnessGoals
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) दीक्षांत सोहळ्यावर बंधने असल्याने यंदाचा १४० व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा प्रबोधिनीच्या मोजक्या जणांच्या उपस्थितीत पार पडला .युट्युबद्वारे या सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आले .नाैदल प्रमुख अॅडमिरल करंबीरसिंग लांबा यांनी विद्यार्थ्यांची मानवंदना स्वीकारली .जवळपास ३०० कॅडेसट्ची तुकडी सशस्त्र दलात समाविष्ट होणार.How’s the Josh! NDA’s 140th Convocation Ceremony: 300 cadets ready for national service; Naval chief Admiral Karambir Singh’s push ups forgetting the age !
खडकवासला परिसरातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रशिक्षण देण्यात येते. प्रबोधिनीत आयोजित होणारा सोहळा दिमाखदार आणि महत्त्वपूर्ण असतो. वर्षातून दोनदा नोव्हेंबर आणि मे महिन्यात संचलन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
६१ वर्षीय तरूण नाैदल प्रमुख यांचा जोश
दरम्यान, या सोहळ्यापूर्वी प्रथेप्रमाणे प्रमुख पाहुणे आदल्या दिवशीच एनडीएत पोहचले . तिथे टॅटू शो आणि लेझर शो झाला. त्यानंतर एनडीएचे माजी विद्यार्थी असल्याने प्रमुख पाहुणे नाैदल प्रमुख अॅडमिरल करंबीरसिंग लांबा यांनी
आपल्या स्क्वाड्रनला आणि अन्य ठिकाणांना भेट देत जुन्या आठवणी ताज्या करत नव्या विद्यार्थ्यांसह धमाल केली .
आपल्या कडक इस्त्रीच्या युनिफॉर्ममध्ये हे फोर स्टार ऑफिसर आपल्या हंटर स्क्वाड्रनला पोहोचले. आणि तिथे चक्क सध्याच्या विद्यार्थांसह त्यांनी पुश अप्सही काढले…वय, पद, वर्दी कुठे मध्ये आली नाही.. त्यात होतं फक्त स्पिरिट ऑफ एनडीए..आणि जोश… सॅल्यूट !
How’s the Josh! NDA’s 140th Convocation Ceremony: 300 cadets ready for national service; Naval chief Admiral Karambir Singh’s push ups forgetting the age !
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीरवरून UN महासभा अध्यक्षांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नोंदवला तीव्र आक्षेप
- BAT In Air India Flight : एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये वटवाघूळ, दिल्लीला परत आणून विमानाची इमर्जन्सी लँडिंग
- नव्या आयटी कायद्यांवर कंपन्या नरमल्या, गुगल, फेसबुक, व्हॉट्सअपसह 7 प्लॅटफॉर्म्सनी अधिकार्यांची नावे शेअर केली, ट्विटरने फक्त वकिलाचे नाव पाठवले
- LAC वर चीनची लष्करी कवायत, सैन्यप्रमुख नरवणे म्हणाले, सीमेवर एकतर्फी बदलास परवानगी नाही, हवाई दलाच्या प्रमुखांनीही घेतला आढावा
- केंद्राने नागरिकत्वासाठी अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेशातील बिगर मुस्लिम निर्वासितांकडून अर्ज मागवले