• Download App
    हाँगकाँगमध्ये लस घतल्यास चक्क कार, सोने, आयफोन मिळणार, प्रोत्साहनासाठी उद्योजक सरसावले। Hong kong declares prizes foe vaccination

    हाँगकाँगमध्ये लस घेतल्यास चक्क कार, सोने, आयफोन मिळणार, प्रोत्साहनासाठी उद्योजक सरसावले

    विशेष प्रतिनिधी

    हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली तर चक्क टेस्ला इलेक्ट्रॉनिक गाडी जिंकण्याची संधी मिळणार आहे. ज्यांचे लसीकरण ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण होईल त्यांना टेस्लाची ‘मॉडेल ३ लाँग रेंज’ या श्रेणीतील मोटार जिंकण्याची संधी मिळणार आहे. या गाडीची किंमत सुमारे ४७ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. Hong kong declares prizes foe vaccination

    हाँगकाँगमध्ये लसीकरण अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्याचा वेग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार देशाची लोकसंख्या साधारण ७५ लाख आहे. त्यापैकी केवळ १५.१ टक्के एवढे लसीकरण पूर्ण झाले आहे.



    लसीकरणासाठी हाँगकाँगमधील उद्योजकांकडूनही बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. त्यात सोन्याची वीट, आयफोन अशा मौल्यवान व महागड्या वस्तू आहेत. काही कंपन्या, रेस्टॉरंट आणि महाविद्यालयेही लशीसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी व्हाउचर, रोख रक्कम आणि जादा वेळ देत आहेत. लस घेतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना अर्जित रजा देण्याचे सरकारने जाहीर केले आहे.

    लसीकरणासाठी हाँगकाँगमधील दोन मोठ्या कंपन्यांनी दोन कोटी डॉलर किमतीच्या प्रोत्साहन योजनांची घोषणा केली आहे. येथील सर्वांत मोठी बांधकाम कंपनी सन हंग काई प्रॉपर्टीज लिमिटेडने आयफोनसह अनेक बक्षीसे जाहीर केली आहेत. प्रसिद्ध उद्योजक ली शाउकी यांची हँडरसन लँड डेव्हलपमेंट कंपनी सोन्याच्या विटा देणार आहे.

    Hong kong declares prizes foe vaccination

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो