राज्यपाल असताना त्यांचा आत्मा का जागृत झाला नाही? असा प्रश्नही विचारला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयकडून मिळालेल्या समन्सबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तपासाच्या गरजेनुसार त्यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आणि सीबीआयने दिलेल्या समन्सचा सत्यपाल मलिक यांनी भाजपा सरकारवर केलेल्या आरोपांशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Home Minister Amit Shahs reaction on the CBI summons received by Satyapal Malik
याशिवाय अमित शाह पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने असे काही केले नाही जे सर्वसामान्यांपासून लपवावे लागेल. वैयक्तिक, राजकीय स्वार्थासाठी काही टिप्पण्या केल्या जात असतील, तर त्यांनाही तसेच वागवले गेले पाहिजे.
गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, माझ्या माहितीनुसार त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले जात आहे. तपास सुरू असून, त्यात काही नवीन माहिती किंवा पुरावे समोर आल्यास त्यांची चौकशी केली जाते. या संदर्भात त्यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आमच्या सरकारच्या विरोधात बोलल्याबद्दल त्यांना बोलावण्यात आलं आहे असं म्हणण्यात काही तथ्य नाही.
त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर ते त्यावेळी गप्प का होते? –
ते पुढे म्हणाले की, ‘’माझा प्रश्न आहे की ते राज्यपाल असताना त्यांचा आत्मा का जागृत झाला नाही? अशा विधानांची विश्वासार्हता काय आहे याचा तपास सर्वसामान्य जनता आणि पत्रकारांकडून केला जाईल. त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर ते त्यावेळी गप्प का होते? या सर्व गोष्टी सार्वजनिक व्यासपीठावर चर्चे करण्यासाठी नसतात. मी या देशातील जनतेला सांगू इच्छितो की, भाजपा सरकारने असे काहीही केलेले नाही, जे लपवावे लागेल.’’
22 एप्रिल रोजी सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना नोटीस पाठवली होती. सीबीआयने आपल्या नोटीसमध्ये सत्यपाल मलिक यांना भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. सीबीआय अकबर रोडवरील गेस्ट हाऊसमध्ये 27 आणि 28 एप्रिल रोजी सत्यपाल मलिक यांची चौकशी करू शकते.
Home Minister Amit Shahs reaction on the CBI summons received by Satyapal Malik
महत्वाच्या बातम्या
- ISRO : अंतराळात वाढला भारताचा दबदबा! ‘इस्रो’ने प्रक्षेपित केले सिंगापूरचे दोन उपग्रह
- सत्तेचा नाही अजून पत्ता तरी मुख्यमंत्रीपदाची वाढली स्पर्धा; महाराष्ट्र – कर्नाटकात सारखाच कित्ता!!
- …अन् राहुल गांधींना सोडावं लागलं दोन दशकांपासून राहत असलेलं शासकीय निवास्थान!
- पुण्यात वरिष्ठ गटाच्या सहाव्या रोलबॉल विश्वकरंडक स्पर्धेला प्रारंभ