• Download App
    काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर बुलडोझर : हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर आमिर खानचे घर उध्वस्त; पण ही तर सुरूवात; वाचा पुढची यादी Hizbul Mujahideen commander Aamir Khan's house destroyed

    काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर बुलडोझर : हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर आमिर खानचे घर उध्वस्त; पण ही तर सुरूवात; वाचा पुढची यादी

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर तिथल्या केंद्रशासित प्रशासनाने प्रदेशातील दुर्लक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेतच, पण त्याचवेळी काश्मीरला आत्तापर्यंत ज्यांनी छळले, दहशतवादाचा अड्डा बनवले, त्या सगळ्या दहशतवाद्यांच्या घरांवर योगी पॅटर्ननुसार बुलडोझरही चालायला लागले आहेत. Hizbul Mujahideen commander Aamir Khan’s house destroyed

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातल्या राजकीय गुंडांच्या संपत्त्या जप्त करून त्यांच्या घरांवर आणि मालमत्तांवर जसे बुलडोझर चालवले तसेच बुलडोझर आता जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घरांवर चालवले जात आहेत. जमाते इस्लामीच्या प्रमुखाची संपत्ती अशीच जप्त करण्यात आली आहे, तर आजच हिजबुल मुजाहिदींचा स्वयंघोषित कमांडर आमिर खान याचे पहलगाम मधले घर प्रशासनाने बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केले आहे. त्याची जमीनही सील केली आहे.

    पण ही तर केवळ अशा कारवाईची सुरुवात आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाने दहशतवाद्यांची आणि टेरर फंडिंग करणाऱ्यांची यादीच तयार केली असून त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशाच्या महसूल विभागालाही कामाला लावले आहे. महसूल विभागाने दहशतवाद्यांची आणि त्यांच्या आर्थिक मास्टरशी यादी तयार करून प्रशासनाला सोपवली आहे. आता टप्प्याटप्प्याने या दहशतवाद्यांच्या संपत्त्या जप्त करून त्यांच्या घरांवरही बुलडोझर चालवण्यात येतील. आमिर खान याच्या घरावर आज चालविलेला बुलडोझर ही या कारवाईची सुरुवात आहे.

    जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या 12 दहशतवाद्यांची यादी तयार केली असून त्यांच्या सर्व संपत्तीची माहिती प्रशासनाने एकत्र केली आहे. जमाते इस्लामीच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई वेगात सुरू आहे. वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या कोअर कमांडरची यादी आधीच प्रशासनाकडे तयार आहे. या पैकी काही कमांडर गेल्या दोन वर्षांमध्ये भारतीय लष्कराच्या कारवाईत मारले गेले आहेत. काश्मीरमध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये ज्या दहशतवादी संघटना फोफावल्या, फैलावल्या त्या सर्व संघटनांची अतिशय तपशीलवार माहिती सरकारने गोळा करून त्यांच्याविरुद्ध धडक कारवाईच्या दृष्टीने तयारी केली आहे. जे दहशतवादी कमांडर मारले गेलेत अथवा जे पाकिस्तानात पळून गेलेत त्या सगळ्यांची संपत्ती विशिष्ट कालावधीत जप्त करून त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात येणार आहेत.

     दहशतवाद्यांच्या कब्जातली हिंदू संपत्ती सोडवणार

    जम्मू काश्मीर मधून हिंदूंचे शिरकाण करून त्यांना आपल्याच भूमीतून विस्थापित केल्यानंतर त्या हिंदूंच्या संपत्तीवर या दहशतवादी कमांडरनी कब्जा केला होता. या हिंदूंच्या संपत्तीची यादी देखील प्रशासनाने तयार केली असून या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात ही संपत्ती पुन्हा संबंधित हिंदू परिवारांकडे सोपविण्याची देखील तयारी प्रशासनाने चालवली आहे. पण त्याआधी दहशतवादी कमांडरच्या घरांवर बुलडोझर चालविण्याची प्रशासनाची कसून तयारी सुरू आहे.

     वाचा ही यादी

    31 डिसेंबर 2022 रोजी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर आमिर खान याची पहलगाम मधली जमीन सील केली आणि त्याच्या घरावर बुलडोझर चालवला. आता
    2023 मध्ये लष्करे तैयबाचा कमांडर जहांगीर याची जमीन सील करून त्याच्याही घरावर बुलडोझर चालवण्यात येईल. त्याच बरोबर हिजबुल मुजाहिद्दीनचा मुख्य कमांडर सय्यद सलाउद्दीन, तथाकथित जनरल अब्दुल्ला, अर्जमंद, असद यजदानी, जावेद यांच्या समवेत दहशतवाद्यांचे 100 कमांडर, त्यांना टेरर फंडिंग करणारे 150 एनजीओ कार्यकर्ते त्याचबरोबर पाकिस्तानात लपून भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणणारे सुमारे 100 दहशतवादी या सगळ्यांच्या संपत्ती जप्त करून त्यांच्या घरावर बुलडोजर चालविण्यात येणार आहेत.

    Hizbul Mujahideen commander Aamir Khan’s house destroyed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप