• Download App
    लालू, तेजस्वी यादव परिवाराच्या मालमत्तांवर छाप्यांत सापडले 1.5 किलो सोने, 70 लाख कॅश आणि बरेच काही!! |Hindustan Times: ₹70 lakh cash, 1.5 kg gold jewellery found during raids on Tejashwi Yadav, sisters

    लालू, तेजस्वी यादव परिवाराच्या मालमत्तांवर छाप्यांत सापडले 1.5 किलो सोने, 70 लाख कॅश आणि बरेच काही!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, राबडीदेवी विद्यमान उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांच्या तीन बहिणींच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मालमत्तांवर घातलेल्या छाप्यांमध्ये सक्तवसुली संचनालया अर्थात ईडीला 1.5 किलो सोने, 70 लाख रुपये कॅश, काही अमेरिकन डॉलर्स आणि बरीच कागदपत्रे सापडली आहेत.Hindustan Times: 70 lakh cash, 1.5 kg gold jewellery found during raids on Tejashwi Yadav, sisters

    जमिनीच्या बदल्यात नोकरी या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराच्या विविध मालमत्तांवर ईडीने छापे घातले आहेत. या छापांची कारवाई गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. परंतु या छाप्यांमध्ये नेमके काय आढळले याच्या बातम्या बाहेर आल्या नव्हत्या. त्या बातम्या आता बाहेर आल्या आहेत. लालूप्रसादांच्या परिवाराच्या दिल्ली, पाटण्यामध्ये विविध ठिकाणी घरे बंगले मालमत्ता आहेत. दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनी तेजस्वी यादव यांचे घर आहे तिथल्या छाप यांच्या वेळी स्वतः तेजस्वी यादव घरात हजर होते.



    या सर्वांवर ईडीची कारवाई सुरू आहे. या कारवाईमध्येच 1.5 किलो सोने, सोन्याचे दागिने, 70 लाख रुपये कॅश काही अमेरिकी डॉलर्स, काही महत्त्वाची कागदपत्रे एवढा ऐवज अधिकाऱ्यांच्या हाती लागला आहे. या संदर्भात तेजस्वी यादव आणि त्यांच्या तीन बहिणींची ईडीचे अधिकारी चौकशी देखील करणार आहेत.

     काँग्रेसचा संताप

    लालूप्रसाद यादव यांच्या परिवारावर ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. लालूप्रसाद सध्या किडनीच्या विकाराने आजारी आहेत. पण तरी देखील त्यांना सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून मोदी सरकार त्रास देत आहे, असे टीकास्त्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोडले आहे. पण लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराच्या मालमत्तांवरच्या छाप्यांमध्ये 1.5 किलो सोने, 70 लाख रुपये कॅश, काही अमेरिकी डॉलर्स आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सापडण्याच्या मुद्द्यावर मात्र काँग्रेस सह सगळ्याच राजकीय पक्षांनी थेट उत्तर न देता मौन पाळणे पसंत केले आहे.

    Hindustan Times: 70 lakh cash, 1.5 kg gold jewellery found during raids on Tejashwi Yadav, sisters

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi : PM मोदी जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार, अनेक द्विपक्षीय बैठकांना उपस्थित राहणार

    Mohan Bhagwat : सरंसघचालक म्हणाले- भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक नाही, संस्कृतीने आधीच हे उघड केले

    Anmol Bishnoi : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अनमोल बिष्णोईला अटक, भारतात येताच एनआयएची कारवाई