वृत्तसंस्था
बंगळुरू : जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात पाहायला मिळाले. येथे हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन गणेश चतुर्थीचा सण साजरा केला. हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही गणपती बाप्पाचा जयजयकार केला आणि एकत्र फोटो काढले. मंडपात लावलेल्या बॅनरमध्ये हिंदू-मुस्लिम मुले गणपतीला मिठी मारताना दिसली. या बॅनरवर ख्रिश्चन क्रॉसदेखील होता.Hindus-Muslims celebrate Ganesh Chaturthi together in Karnataka, hail Ganesh Bappa
हुबळी येथील ईदगाह मैदानावर गणपती स्थापनेवरून दोन पक्षांमध्ये तणावाचे वृत्त असताना कर्नाटकात हे चित्र समोर आले आहे. वृत्तानुसार, मंड्याच्या बीडी कॉलनीमध्ये सामंजस्याचे हे चित्र पाहायला मिळाले आहे. बीडी कॉलनी हा मुस्लिम बहुल परिसर आहे. दोन्ही समुदायांनी एकत्र येऊन एकतेचा संदेश देत गणेश चतुर्थीचा सण साजरा केला आणि हिंदू परंपरेतून पूजेत मुस्लिम लोकांनीही सहभाग घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मंड्यातील गणपती उत्सवातून मांडलेल्या सद्भावना आणि एकतेच्या उदाहरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
हुबळीतील गणेशपूजेचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला
हुबळीच्या ईदगाहमध्ये गणपतीची मूर्ती बसवण्यास वक्फ बोर्डाने विरोध दर्शवला होता. हुबळी-धारवाड महापालिकेने दिलेल्या परवानगीनुसार तीन दिवस ईदगाह मैदानात गणपतीची मूर्ती राहणार आहे. महापालिकेच्या परवानगीचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने कायम ठेवला. कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी गणेश पूजेच्या आयोजनाला परवानगी दिली.
बंगळुरूत परवानगी नाही
त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने बंगळुरू येथील ईदगाह मैदानावर गणेश पूजेचे आयोजन करण्यास परवानगी दिली नाही आणि घटनास्थळी यथास्थिती ठेवण्याचे निर्देश दिले. श्री रामसेना प्रमुख प्रमोद मुथालिक यांनीही हुबळी येथील ईदगाह मैदानावर सुरू असलेल्या गणेश पूजेत सावरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांचे छायाचित्र त्यांच्या समर्थकांसह दाखवले.
Hindus-Muslims celebrate Ganesh Chaturthi together in Karnataka, hail Ganesh Bappa
महत्वाच्या बातम्या
- LPG Cylinder Price : LPG सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या काय आहेत दिल्ली ते मुंबईचे नवे दर?
- Rule Change From 1st September : आजपासून होणार हे 6 मोठे बदल, जाणून घ्या कसा वाढला तुमच्या खिशावरचा भार!
- Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत 117 नेते सहभागी होणार, कन्हैया कुमार आणि पवन खेरा यांचेही नाव यादीत
- अमरावतीत लव्ह जिहाद; धर्मांध मुसलमानाने फसवले उच्चविद्याविभूषित हिंदू तरुणीला!!