विशेष प्रतिनिधी
हुब्बळी : मंदिरांना निधी खर्च करण्यासाठी वारंवार सरकारी अधिकाºयांकडे खेटे लागू नयेत, तसेच स्वतंत्र अस्तित्व टिकावे यासाठी कर्नाटकातील हिंदू मंदिरे कायद्याने स्वतंत्र करणार असल्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.Hindu temples in Karnataka to be made independent by law, CM announces
बसवराज बोम्मई म्हणाले, मंदिरांना स्वतंत्रपणे कामकाज करता यावे यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राज्य सरकार कायदा बनवेल.भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोम्मई यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सध्या हिंदू मंदिरांवर वेगवेगळे कायदे आणि नियमांचे नियंत्रण आहे.
या मंदिरांचे स्वतंत्र अस्तित्व असावे यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी कायदा आणू. अनेक धार्मिक ठिकाणांचे कामकाज वेगवेगळ्या कायद्यांखाली सुरक्षितपणे सुरू आहे आणि त्यांना आराधनेचे स्वातंत्र्यही आहे. परंतु, आमच्या हिंदू मंदिरांचे नियंत्रण नियम आणि कायद्यांनी केलेले आहे.
तसेच या मंदिरांना त्यांचा स्वत:चा निधीही वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मंदिरांकडील निधी वापरण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाला सरकारी अधिकाऱ्यांची मागावी लागणारी परवानगी बंद झाली पाहिजे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सगळी मंदिरे ही स्वतंत्रपणे कामकाज करतील आणि त्यासाठी आम्ही कायदा करू असे आश्वासन बसवराज बोम्मई यांनी दिली.
Hindu temples in Karnataka to be made independent by law, CM announces
महत्त्वाच्या बातम्या
- खिस्ती धर्मगुरूने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पत्नीने बनविला व्हिडीओ
- आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, 351 उपकरणांची संरक्षण मंत्रालय करणार नाही आयात
- तलाकशुदा महिलांशी पंतप्रधानांनी साधला संवाद, स्वावलंबी होण्याचा दिला मंत्र
- मनी मॅटर्स : लवकर निवृत्त होणे म्हणणे फार सोपो, पण नोकरी सोडताना हा विचार कराच