• Download App
    हिंदू समाज मुघलांना घाबरला नाही; महाराणा प्रताप - छत्रपती शिवाजी महाराज आठवा; असदुद्दीन ओवैसींच्या धमक्यांवर कठोर प्रहार!! Hindu society did not intimidate the Mughals; Maharana Pratap - Remember Chhatrapati Shivaji Maharaj

    हिंदू समाज मुघलांना घाबरला नाही; महाराणा प्रताप – छत्रपती शिवाजी महाराज आठवा; असदुद्दीन ओवैसींच्या धमक्यांवर कठोर प्रहार!!

    वृत्तसंस्था

    देवरिया (उत्तर प्रदेश) : योगी – मोदी गेल्यावर तुमच्याकडे बघून घेऊ अशा धमक्या उत्तर प्रदेश पोलिसांना देणाऱ्या हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर सोशल मीडियातून जबरदस्त प्रहार होत असून तुम्ही पोलिसांना काय नेस्तनाबूत करणार? महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेणारा हिंदू समाज मुघलांना घाबरला नाही. तो तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरेल काय!!, अशा शब्दांमध्ये सोशल मीडियावर ओवैसींचा धमक्यांची वासलात लावण्यात आली आहे. Hindu society did not intimidate the Mughals; Maharana Pratap – Remember Chhatrapati Shivaji Maharaj

    खासदार असदुद्दीन ओवैसी आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत होते. परंतु, आता त्यांनी थेट उत्तर प्रदेशाच्या पोलिसांनाच धमकी दिली आहे. राज्यातील देवरिया मतदारसंघ असते मुस्लिम मेळाव्यात बोलत होते.

    असदुद्दीन ओवैसी म्हणाले, की आम्ही पोलिसांचे अत्याचार विसरणार नाही. इथला मुसलमान त्या अत्याचारांना विसरू शकणार नाही. आज योगी आणि मोदींच्या बळावर यूपीचे पोलीस मुसलमानांवर अत्याचार करत आहेत. परिस्थिती खराब असल्यामुळे मुसलमानांवर अन्याय होतो आहे, पण मुसलमान हा अन्याय कधीच विसरणार नाहीत. योगी – मोदी हे कायमचे राहणार मोदी कायमचे पंतप्रधान नाहीत. योगी हे कायम मुख्यमंत्री राहणार नाहीत. योगी आपल्या मठात निघून जातील. मोदी पहाडांमध्ये तप करायला निघून जातील. तेव्हा तुम्हाला कोण वाचवायला येईल…??, मुसलमान कधीही अत्याचार विसरणार नाही. मग आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ. नेस्तनाबूत करू, अशा धमकी भरल्या शब्दांमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना आव्हान दिले आहे.

    ओवेसीं च्या धमकीभरल्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. ओवैसींनी फक्त उत्तर प्रदेश पोलिसांना आव्हान दिले नसून सगळ्या हिंदू समाजाला आव्हान दिले आहे, असे भाजपचे आमदार सत्यपाल सिंग बग्गा यांनी ट्विटरवर म्हटले आहे, तर हिंदू समाज हा महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतो. “यदा यदाही धर्मस्य” या तत्वावर हिंदू समाजाचा विश्वास आहे. योगी – मोदी नंतर देखील असे अनेक वीर पुत्र जन्माला येतील. तेव्हा ओवैसीने धमकी देण्याच्या फंदात पडू नये, असे ट्विट संबित पात्रा यांनी केले आहे.

    अयोध्येतल्या रामाने ताकद दाखवली आहे. काशी विश्वनाथाने ताकद दाखवली आहे. पोलिसांना मुसलमानांनी हात तर लावून दाखवा मग बघू त्यांची कशी वाट लागते ते!! ओवैसीने आपल्या धमक्या स्वतः जवळच ठेवाव्यात, असे ट्विट भाजपचे नेते शलभ मणि त्रिपाठी यांनी केले आहे.

    तर, “धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे”, अशा शब्दांमध्ये भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस विजया रहाटकर यांनी असदुद्दीन ओवैसी धमकी भरल्या वक्तव्याचा कङक समाचार घेतला आहे.

    Hindu society did not intimidate the Mughals; Maharana Pratap – Remember Chhatrapati Shivaji Maharaj

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!