• Download App
    आग्रीपाड्यातली कौशल्य विकास केंद्राची जागा उर्दू लर्निंग सेंटरला; नवाब मलिकांच्या निर्णयाविरोधात हिंदुत्ववादी संघटना संतप्त Hindu organisations opposed urdu learning centre in Mumbai aagripada

    आग्रीपाड्यातली कौशल्य विकास केंद्राची जागा उर्दू लर्निंग सेंटरला; नवाब मलिकांच्या निर्णयाविरोधात हिंदुत्ववादी संघटना संतप्त

    प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात आग्रीपाडा येथील कौशल्य विकास केंद्रासाठी आरक्षित जमीन उर्दू लर्निंग सेंटरला देण्याचा प्रताप त्यावेळचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने यासाठी मुस्लिमांना खुश कारण्याकरता जमिनीवरील आरक्षण बदलेल त्याला भाजपचे आमदार नितेश राणे तीव्र विरोध केला. तसेच उर्दू लर्निंग सेंटरसाठी दिलेली जागा पुन्हा कौशल्य विकास केंद्राला देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. Hindu organisations opposed urdu learning centre in Mumbai aagripada

    नवाब मलिकांच्या कार्यकाळात निर्णय 

    यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले की, कुणाचीही भाषा आणि धर्म यांच्या विरोधात आम्ही नाही. मुंबईमध्ये उर्दू भाषाभवन बांधायचे असेल, तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसलमानांची वस्ती आहे, तेथे बांधा. पण मराठी हिंदू बांधव राहातात, त्या ठिकाणी उर्दू लर्निंग सेंटर कशासाठी? याचे उत्तर आम्हाला मिळायला हवे. मुंबईमध्ये पाणी तुंबले, रस्ते खराब झाले, तर महापालिका एवढ्या तत्परतेने काम करताना दिसत नाही, मात्र महाविकास आघाडीच्या काळात उर्दू लर्निंग सेंटरला मुंबई महापालिकेने केवळ १० महिन्यांत परवानगी देऊन १२ कोटी रुपयांची तरतूदही केली. या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र होणार होते. यामध्ये यातून मराठी युवकांना नोकर्‍या आणि त्याविषयीचे प्रशिक्षण मिळाले असते. असे असताना कौशल्य विकास केंद्राची मान्यता का रद्द करण्यात आली?, याचे उत्तर मुंबईकरांना मिळायला हवे. नवाब मलिक कौशल्य विकासमंत्री असताना हे काम झाले आहे, असे आमदार नितेश राणे म्हणाले.

    हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन 

    आग्रीपाडा येथे होऊ घातलेल्या उर्दू लर्निंग सेंटरच्या विरोधात ४ डिसेंबर या दिवशी स्थानिक आग्रीपाडा संघर्ष समितीने आंदोलन केले. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधीही या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’ अशा घोषणा देण्यात आल्या. आग्रीपाडा येथील श्री साईबाबा मंदिराच्या येथून आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलक काही अंतरावर गेल्यावर पोलिसांनी आंदोलकांना अडवले. या वेळी आमदार नीतेश राणे यांनी उर्दू लर्निंग सेंटर तेथपर्यंत आंदोलन नेण्याची आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी तेथपर्यंत आंदोलकांना जाऊ दिले. आंदोलनात स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

    Hindu organisations opposed urdu learning centre in Mumbai aagripada

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट