वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आपल्या अहवालांद्वारे शेअर बाजारात खळबळ माजवणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चने आता लवकरच आणखी एक ‘मोठा अहवाल’ आणणार असल्याचे सांगितले आहे. Hindenburg’s new claim, which is creating a sensation around the world, will have another report
शॉर्ट सेलिंग फर्मने ट्विटमध्ये म्हटले आहे की, लवकरच एक मोठा अहवाल येत आहे. विशेष म्हणजे हिंडेनबर्गच्या मागील अहवालामुळे भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांचे शेअर बाजारात मोठे नुकसान झाले. एवढेच नाही, तर अदानींच्या अनेक कंपन्या सेबीच्या देखरेखीखाली गेल्या.
काय आहे हिंडेनबर्ग रिसर्च?
हिंडनबर्ग रिसर्च ही एक आर्थिक संशोधन संस्था आहे, जी इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटवरील डेटाचे विश्लेषण करते. त्याची स्थापना 2017 मध्ये नॅथन अँडरसन यांनी केली आहे. हिंडेनबर्ग रिसर्च हेज फंड व्यवसाय देखील चालवते. ही कंपनी कॉर्पोरेट जगाच्या व्यवहारांबद्दल खुलासे करण्यासाठी ओळखले जाते. कंपनीचे नाव 1937 मध्ये झालेल्या हिंडेनबर्ग आपत्तीवर आधारित आहे, जेव्हा एका जर्मन प्रवासी विमानाला आग लागली आणि 35 लोकांचा मृत्यू झाला होता.
कंपनी शोधून काढते की शेअर मार्केटमध्ये पैशांचा गैरवापर झाला आहे का? एखाद्या कंपनीच्या खात्यातील गैरव्यवस्थापन आहे का? तसेच एखादी कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी शेअर बाजारात चुकीच्या पद्धतीने सट्टा लावून इतर कंपन्यांच्या शेअर्सचे नुकसान करत आहे का!
याआधीही चर्चेत राहिले हिंडेनबर्ग?
अदानी समूह हा पहिला नाही ज्यावर अमेरिकन फर्मने अहवाल जारी केला आहे. यापूर्वी, अमेरिका, कॅनडा आणि चीनच्या सुमारे 18 कंपन्यांचे स्वतंत्र अहवाल प्रकाशित केले आहेत, त्यानंतर बराच गोंधळ झाला होता. बहुतेक कंपन्या अमेरिकेतील होत्या, ज्यांना वेगवेगळ्या आरोपांचा सामना करावा लागला.
हिंडनबर्गचा सर्वाधिक चर्चेचा अहवाल निकोला या अमेरिकेतील ऑटो क्षेत्रातील मोठ्या कंपनीबद्दल होता. या अहवालानंतर निकोलाचे शेअर्स 80 टक्क्यांनी तुटले. निकोलावरील अहवालाने व्हिसलब्लोअर्स आणि माजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कथित फसवणूक उघड केली. निकोलाचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष ट्रेवर मिल्टन यांनी तत्काळ कंपनीचा राजीनामा दिला. अहवालानंतर कंपनीची चौकशी सुरू आहे.
Hindenburg’s new claim, which is creating a sensation around the world, will have another report
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!
- माहीमचा अनधिकृत दर्गा तोडा; नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु… राज ठाकरेंचा इशारा
- मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!
- राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!