• Download App
    स्वतःची गरिबी हटविण्यासाठी अल्पसंख्यांक समूदायाने कुटुंब नियोजन करावे; आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांचे आवाहन Himanta Biswa Sarma urges minority community to adopt ‘decent family planning policy’ for poverty reduction

    स्वतःची गरिबी हटविण्यासाठी अल्पसंख्यांक समूदायाने कुटुंब नियोजन करावे; आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांचे आवाहन

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी – आसाममधील अल्पसंख्यांक समूदायाने आपली गरिबी हटविण्यासाठी कुटुंब नियोजन करावे, असे आवाहन आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आज केले. राज्य सरकारला ३० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अल्पसंख्यांक समूदायाच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. मंदिरांच्या आणि जंगलांच्या जमिनीवर कोणाचेही अतिक्रमण आसाम सरकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. Himanta Biswa Sarma urges minority community to adopt ‘decent family planning policy’ for poverty reduction

    अल्पसंख्यांक समूदायाने आपली गरिबी दूर करण्यासाठी कुटुंब नियोजन करून कुटुंबाची सदस्य संख्या मर्यादित ठेवावी. यासाठी महिलांचे प्रबोधन करावे. सरकार त्यासाठी मदत करेल. अल्पसंख्यांक समूदायातील सुजाण, सुशिक्षित नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हेमंत विश्वशर्मा यांनी केले.



    आपला सगळ्यांचा विकास करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आपल्या विकासाच्या योजनाही मोठ्या प्रमाणात सरकार अमलात आणते. पण अवाढव्य लोकसंख्येचा राक्षस हा विकास खाऊन टाकतो. अन्न, शिक्षण, आरोग्य या व्यवस्था पुरेशा मिळत नाहीत. विकासाची फळे जादा लोकसंख्येमुळे सर्व नागरिकांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाहीत. याचे आत्मपरीक्षण अल्पसंख्यांक समूदायातील सुजाण नागरिकांनी करावे. आपल्या समाजाला प्रगतीसाठी हे आवश्यक आहे, यावर विश्वशर्मा यांनी भर दिला.

    आसाममध्ये मंदिरांच्या आणि जंगलांच्या जमिनीवर कोणात्याही समूदायाचे अतिक्रमण आसाम सरकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी असे अतिक्रमण न करण्याचे आश्वासन अल्पसंख्यांक समूदायाच्या प्रतिनिधींनी दिले.

    Himanta Biswa Sarma urges minority community to adopt ‘decent family planning policy’ for poverty reduction

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!