वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशातून चक्क हिमालयाची शिखरे आता स्पष्टपणे दिसू लागली आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे प्रदूषण घटले आहे. त्याचा थेट परिणाम हिमालय दर्शनातून झाला आहे.Himalayan peaks are visible from Saharanpur Of Uttar pradesh State.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यामुळे अत्यावश्यक वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद आहेत. यामुळे प्रदूषणात कमालीची घट झाली आहे.
पावसामुळे हवेत उडणारे सूक्ष्म कण नष्ट झाले आहेत. प्रदूषणात कमालीची घट झाल्याने आता दृश्यमानता वाढली आहे. त्यामुळे सहारनपूरमधून थेट हिमालयाची शिखरे दिसू लागली आहेत.
थेट हिमालयाचं दर्शन होत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. तसेच हिमालयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.सहारनपूर देहरादूनजवळीत पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्हा आहे.
इतक्या लांबून हिमालयाचं शिखरं दिसू लागल्यानेआयकर अधिकरी दुष्यंत सिंह यांना आश्चर्य वाटलं. दुष्यंत सिंह यांनी कॅमेऱ्यात तात्काळ हे फोटो काढले. दुष्यंत यांनी वसंत विहार कॉलनीतून हे फोटो क्लिक केले.
हिमालयातील गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा स्पष्ट दिसू लागल्या आहेत. हे फोटो दुष्यंत सिंह यांनी २० मे रोजी काढले आहेत. आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
“मागच्या लॉकडाउनमध्येही हिमालयातील पर्वतरांगा दिसत होत्या. मात्र ,यावेळी गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा स्पष्ट दिसत आहेत”, असं दुष्यंत सिंह यांनी सांगितलं.
Himalayan peaks are visible from Saharanpur Of Uttar pradesh State.
महत्त्वाच्या बातम्या
- Gadchiroli Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू, 13 नक्षलवादांचा खात्मा
- कोरोनाची दुसरी लाट डॉक्टरांसाठीही घातक, तीनशेहून अधिक डॉक्टरांचा मृत्यू
- तेलंगणमधील युवकाने बनविला जबरदस्त ‘इलेक्ट्रिक मास्क’, रुग्णांना शुद्ध हवाही घेता येणार
- गोव्यात आठवडाभरात सुमारे पाचशे जणांचा कोरोनाने घेतला बळी
- दिल्लीत १२० वर्षांत प्रथमच मे मध्ये तुफान पाऊस, श्रीनंगरपेक्षा कमी तापमानाची नोंद