• Download App
    HijabControversy : "क्लासरूम महत्त्वाची, युनिफॉर्म नव्हे"; रामचंद्र गुहांनी ट्विट केला एका प्राध्यापिकेचा लेख!! |HijabControversy: "Classroom is important, not uniform"; Ramchandra Guha tweeted an article by a professor

    HijabControversy : “क्लासरूम महत्त्वाची, युनिफॉर्म नव्हे”; रामचंद्र गुहांनी ट्विट केला एका प्राध्यापिकेचा लेख!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाबचा वाद आता देशपातळीवर पोहोचून त्यावर शहरा – शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये दोन तट निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी आणि विचारवंतांनी देखील त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.HijabControversy: “Classroom is important, not uniform”; Ramchandra Guha tweeted an article by a professor

    स्वतःला लिबरल म्हणवणार्‍या विचारवंतांनी हिजाबच्या बाजूने अतिशय चतुराईने युक्तिवाद करायला देखील सुरुवात केली आहे. यातच प्रख्यात गांधी चरित्रकार रामचंद्र गुहा यांची देखील भर पडली आहे. स्वतःचे मत गुलदस्त्यात ठेवून रामचंद्र गुहा यांनी कर्नाटकातील मेंगलोर युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका परिणिता शेट्टी यांचा “इंडियन एक्सप्रेस” मधला लेख ट्विट केला आहे. “क्लासरूम महत्त्वाची, युनिफॉर्म नव्हे”, असे या लेखाचे शीर्षक आहे. सध्याच्या हिसाब वादावर अतिशय “मार्मिक लेख”, अशी टिप्पणी करून रामचंद्र गुहा यांनी त्या लेखाची लिंक ट्विट केली आहे.



    दुसरे लिबरल विचारवंत आणि बॉलिवूडचे लेखक जावेद अख्तर यांनी देखील हिजाब मुद्द्यावर अशीच भूमिका घेतली आहे. मी हिजाब आणि बुरख्याच्या विरोधात जरूर आहे. परंतु ज्या पद्धतीने कर्नाटकात मुलींना घाबरवले जात आहे ही पद्धत चुकीची आहे, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे.

    पण रामचंद्र गुहा आणि जावेद अख्तर या पुरोगामी लिबरल विचारवंतांनी मूळात हा वाद कोणी सुरू केला? आणि हा हिजाबचा वाद नसून शाळेतील गणवेश यासंदर्भातला वाद आहे याबाबत मात्र पूर्णपणे मौन बाळगलेले दिसत आहे.

    HijabControversy: “Classroom is important, not uniform”; Ramchandra Guha tweeted an article by a professor

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!