• Download App
    #HijabBan ट्विटर वर जोरदार ट्रेंड; हिजाबच्या आडून पुरुषी मानसिकता मुलींवर लादण्याचा प्रयत्न!!|HijabBan Strong trend on Twitter; Trying to impose masculine mentality on girls under hijab

    #HijabBan ट्विटर वर जोरदार ट्रेंड; हिजाबच्या आडून पुरुषी मानसिकता मुलींवर लादण्याचा प्रयत्न!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकातील हिजाब वादाचे देशभर पडसाद उमटायला लागल्यानंतर त्याचे राजकीय रणकंदनात रूपांतर झाले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही जागच्या हिजाब वादात उडी घेऊन हिजाब घालायचा का बिकनी घालायची, हे महिलांचे महिलांना ठरवू द्या, असे ट्विट करताच त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. त्याचवेळी ट्विटरवर #Bikini हा हॅशटॅगही ट्रेंड झाला आहे.HijabBan Strong trend on Twitter; Trying to impose masculine mentality on girls under hijab

    पण त्यापलिकडे जाऊन प्रख्यात पत्रकार तवलीन सिंग, रुबिया लियाकत, निघत अब्बास आदी महिलांनी हिजाबच्या आडून मुस्लिम मुलींवर बालपणापासून पुरुषी मानसिकता लादायचा हा प्रकार असल्याची टीका केली आहे. मुलींनी हिजाब घातला पाहिजेत कारण पुरुषांना मुलींना आणि महिलांना हिजाब मध्ये पाहायचे आहे, असे ट्विट तवलीन सिंह यांनी केले आहे.


     


     

    हिजाब प्रकरणात काँग्रेसची सध्याची भूमिका पाहून अनेकांना शहाबानो प्रकरणात राजीव गांधींच्या काळात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेचे आठवण झाली आहे.#hjiabnahikitabdo हिजाब नही किताब दो असा हॅशटॅग त्यांनी ट्विटरवर चालवला आहे. कोणत्याही मदरशांमध्ये विद्यार्थिनींना शॉर्ट स्कर्ट घालून येण्याची परवानगी तिथले मौलवी देतील का?,

    असा परखड सवाल निघत अब्बास यांनी केला आहे. शालेय गणवेशाला आणि शिस्तीला विरोध करण्यासाठी हिजाबच्या मुद्द्याचा वापर करण्यात येतो आहे, या मुद्द्याकडे रुबिया लियाकत यांनी लक्ष वेधले आहे. यातून सध्या #HijabbBan हा हॅशटॅग ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होताना दिसतो आहे.

    HijabBan Strong trend on Twitter; Trying to impose masculine mentality on girls under hijab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज