• Download App
    Hijab Tipu Sultan : हिजाब बंदीनंतर कर्नाटकात टिपू सुलतानचे "गौरव पाठ" शालेय अभ्यासक्रमातून काढणार!!। Hijab Tipu Sultan: After hijab ban, Tipu Sultan's "Gaurav Path" will be removed from school curriculum in Karnataka !!

    Hijab Tipu Sultan : हिजाब बंदीनंतर कर्नाटकात टिपू सुलतानचे “गौरव पाठ” शालेय अभ्यासक्रमातून काढणार!!

    वृत्तसंस्था

    बेंगलुरू : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे. या हिजाब बंदीच्या मोठ्या निर्णयानंतर कर्नाटक सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. हा निर्णय म्हणजे कर्नाटक सरकार टिपू सुलतानचा गौरव करणारे धडे बदलणार आहे. Hijab Tipu Sultan: After hijab ban, Tipu Sultan’s “Gaurav Path” will be removed from school curriculum in Karnataka !!

    कर्नाटक सरकार शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सुधारणा करणार आहे. या प्रक्रियेत 18 व्या शतकातील शासक टिपू सुलतानचा “गौरव” करणाऱ्या अध्यायांवर अधिक लक्ष दिले जाणार असल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे, हिजाब वाद आणि हिंदू मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापार्‍यांवर बंदी यावरून सरकारला आधीच टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता शिक्षणाशी संबंधित आणखी एका मुद्द्यावरून सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.



    टिपू सुलतानचा गौरव करणारा भाग वगळणार?

    समितीने राज्य पुस्तकांमध्ये विशेषतः टिपू सुलतानशी संबंधित असलेल्या पुस्तकांमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली असल्याचे कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी सांगितले. चर्चेनंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार असून अद्याप या प्रक्रियेची माहिती नाही. अहवालात 18 व्या शतकातील शासक टिपू सुलतानवरील इतिहासाचे धडे बदलण्याचा प्रस्ताव असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समितीने टिपू सुलतानवरील धडे सुरू ठेवण्यास सांगितले आहे. तर, टिपू सुलतानचा गौरव करणारा भाग काढून टाकण्याची सूचना केली आहे. मात्र, कोणते भाग काढले जाणार हे अद्याप समोर आले नाही.

    Hijab Tipu Sultan : After hijab ban, Tipu Sultan’s “Gaurav Path” will be removed from school curriculum in Karnataka !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    झारखंडच्या लातेहारमध्ये खाण सर्वेक्षण कंपनीच्या साईटवर नक्षलवाद्यांचा हल्ला

    Farooq Abdullah : फारुख अब्दुल्ला म्हणाले- पहलगाम हल्ल्यात लोकल सपोर्ट; मेहबूबा म्हणाल्या- हे काश्मिरी विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांसाठी धोक्याचे

    Prime Minister Modi : नवी दिल्लीत घडामोडींना वेग! हवाई दल प्रमुखांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट