• Download App
    हिजाब बंदीवर कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात होळीच्या सुट्टीनंतर सुनावणी Hijab Supreme Court karnataka highcourt after holi

    Hijab Supreme Court : हिजाब बंदीवर कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात होळीच्या सुट्टीनंतर सुनावणी

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटक हायकोर्टाने शाळांमध्ये हिजाब बंदीच्या दिलेल्या निर्णयावर होळीच्या सुट्टीनंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. होळीनंतर या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख निश्चित करणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. Hijab Supreme Court karnataka highcourt after holi

    कर्नाटक हायकोर्टाने हिजाब वादावर आपला निर्णय दिला होता, त्यात न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबला परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अनेक विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत.

    – तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळली

    विद्यार्थिनींची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी सोमवारीच या प्रकरणाची सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना सरन्यायाधीश म्हणाले की, या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख होळीनंतर निश्चित केली जाणार आहे.

    – हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही

    कर्नाटक हायकोर्टाने मंगळवारी उडुपी येथील ‘गव्हर्नमेंट प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेज’च्या मुस्लिम विद्यार्थिनींच्या वर्गात हिजाब घालण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळून लावली आणि असे म्हणत हिजाब हा इस्लामिक धर्माचा अनिवार्य भाग नसल्याचे सांगितले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्णतः हिजाब बंदी योग्यच असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. यावेळी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, शालेय गणवेशाचा नियम हा वाजवी निर्बंध आहे आणि तो घटनात्मकदृष्ट्या मान्य आहे, ज्यावर विद्यार्थिनी कोणताही आक्षेप घेऊ शकत नाहीत.

    – हायकोर्टाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा

    काही दिवसांपूर्वी कर्नाटकात हिजाबच्या वादावरून बराच गदारोळ झाला होता, ज्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम संघटना आमने-सामने आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तर दुसरीकडे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाचा आदेश “असंवैधानिक” असल्याचा दावा करत आपली कायदेशीर लढाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

    Hijab Supreme Court karnataka highcourt after holi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : CJI म्हणाले-AIने न्यायिक प्रक्रियेवर वर्चस्व गाजवू नये असे आम्हाला वाटते; न्यायव्यवस्थेत AI चा वापर थांबवण्याची याचिका फेटाळली

    Babri Masjid : बंगालमध्ये आज बाबरीच्या पायाभरणीची तयारी; निलंबित तृणमूल काँग्रेस आमदाराचे समर्थक डोक्यावर विटा घेऊन पोहोचले; 3,000 सुरक्षा दल तैनात

    Nirmala Sitharaman : पान मसाला-सिगारेटवर नवीन कर लागेल; अर्थमंत्री म्हणाल्या- याचा वापर राष्ट्रीय सुरक्षेसाठी होईल