• Download App
    हिजाब वाद : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणात कासिफ, नदीमसह 6 जणांना अटक 12 संशयितांची चौकशी - तपास!! |Hijab controversy: Bajrang Dal activist's murder case: Kasif, Nadeem and 6 others arrested 12 suspects interrogated - Investigation

    हिजाब वाद : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणात कासिफ, नदीमसह 6 जणांना अटक 12 संशयितांची चौकशी – तपास!!

    वृत्तसंस्था

    शिवमोग्गा : कर्नाटकात शिवमोग्गा जिल्ह्यात हिजाब वादातून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या दोन जणांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कासिफ आणि नदीम अशी त्यांची नावे असून त्यांच्यासह एकूण 6 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मी प्रसाद यांनी दिली आहे.Hijab controversy: Bajrang Dal activist’s murder case: Kasif, Nadeem and 6 others arrested 12 suspects interrogated – Investigation

    अटक केलेल्या 6 जणांवर व्यतिरिक्त 12 संशयितांची या हत्या प्रकरणात चौकशी करण्यात येत असून लवकरच संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात येईल, असे लक्ष्मी प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. अटक केलेल्या कासिफवर आधीच 10 ते 12 गंभीर गुन्ह्यांची विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद आहे, अशी माहिती कर्नाटकचे मंत्री आणि शिवमोग्गा जिल्ह्याचे पालक मंत्री के. सी. नारायण गौडा यांनी सकाळी दिली होती.



    कासिफ आणि नदीम या ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशी दरम्यान आणखी 3 जणांची नावे पुढे आली होती. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आणखी 2 जणांची नावे पुढे आली. या सगळ्या प्रकरणात गुन्हेगारांची मोठी साखळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यातूनच अटक आणि चौकशी सत्र सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने या हत्याप्रकरणातील कटाचा खुलासा करण्यात येईल, असेही लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले.

    – शिवमोग्गामध्ये कलम 144

    शिवमोग्गा येथे हिजाबच्या वादातून बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची काल भोसकून हत्या करण्यात आली होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिवमोग्गामध्ये तणाव वाढल्याने शहरात 144 कलम लागू करावे लागले आहे.

    कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी मृत बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांची भेट घेतली. ही घटना झाली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. हर्षा ( 26 वर्षीय) असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. हर्षाने फेसबुक प्रोफाइलवर हिजाबच्या विरोधात पोस्ट लिहिली होती. त्याने भगव्या शालीचा वापर केला होता. पोलीस या प्रकरणाचा हिजाब वादाशी संबंध जोडून तपास करत आहेत.

    अनेक हिंदू संघटना कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास विरोध करत आहेत. हिजाबच्या निषेधार्थ हे कार्यकर्ते भगवी शाल परिधान करून निषेध व्यक्त करत आहेत. वाढता तणाव पाहता संपूर्ण शिवमोग्गामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.

    144 कलम लागू केल्यानंतर आहे आज सकाळी शहर एक दोन ठिकाणी वाहने जाळपोळीचा प्रकार घडला आहे.

    Hijab controversy: Bajrang Dal activist’s murder case: Kasif, Nadeem and 6 others arrested 12 suspects interrogated – Investigation

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य