• Download App
    कोरोनाने झालेले ६५ मृत्यू लपविले, हरिद्वारमधील खासगी रुग्णालयावर होणार कारवाई|Hides 65 corona deaths, action to be taken against private hospital in Haridwar

    कोरोनाने झालेले ६५ मृत्यू लपविले, हरिद्वारमधील खासगी रुग्णालयावर होणार कारवाई

    कोरोनाने झालेले ६५ मृत्यू लपवून ठेवल्याप्रकरणी हरिद्वार येथील एका खासगी रुग्णालयावर उत्तराखंड सरकारने कारवाई केली आहे. या रुग्णालयाने सुमारे पंधरा दिवस कोरोनाने झालेले मृत्यू लपवून सरकारी नियमावलीचा भंग केला.Hides 65 corona deaths, action to be taken against private hospital in Haridwar


    विशेष प्रतिनिधी

    डेहराडून : कोरोनाने झालेले ६५ मृत्यू लपवून ठेवल्याप्रकरणी हरिद्वार येथील एका खासगी रुग्णालयावर उत्तराखंड सरकारने कारवाई केली आहे. या रुग्णालयाने सुमारे पंधरा दिवस कोरोनाने झालेले मृत्यू लपवून सरकारी नियमावलीचा भंग केला.

    राज्याचे मंत्री सुबोध उनियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयाची चौकशी करून आवश्यक कायदेशिर कारवाई केली जाणार आहे. बाबा बर्फानी रुग्णालयात २५ एप्रिल ते १२ मे दरम्यान ६५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.



    मात्र, रुग्णालयाने ही माहिती राज्य सरकारपासून लपवून ठेवली. राज्याच्या कोविड नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून कारवाईचा इशारा दिल्यावर या रुग्णालयाने सत्य परिस्थिती मान्य केली.

    रुग्णालय व्यवस्थापनाने यासाठी कारणेही दिली आहेत. पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने आम्हाला मृत्यूची माहिती देता आली नाही, असे म्हटले आहे.
    राज्यातील सर्व रुग्णालयांनी कोरोनाने झालेल्या मृत्यूंची माहिती कोविड नियंत्रण कक्षाला चोवीस तासात देणे बंधनकारक आहे.

    उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत मृत्यूचा आकडा अचनाक वाढला होता. त्यामुळे आरोग्य सचिव अमित नेगी यांनी सर्व खासगी रुग्णालयांना पत्र लिहून कोरोनाने झालेल्या मृत्यूची माहिती तातडीने देण्यास सांगितले होते. अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही दिला होता.

    Hides 65 corona deaths, action to be taken against private hospital in Haridwar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chabahar Port, : चाबहार बंदरावरील अमेरिकेच्या निर्बंधांतून भारताला सूट; ट्रम्प यांनी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार