ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती, ज्याचा व्हिडिओ काल समोर आला आणि राजकारण तापले. या प्रकरणावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असतानाच आता भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. Hema Malini response to Gulabrao Patil controversial statement, what exactly did she say? Read more
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालाशी केली होती, ज्याचा व्हिडिओ काल समोर आला आणि राजकारण तापले. या प्रकरणावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असतानाच आता भाजप खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. हा ट्रेंड काही वर्षांपूर्वी लालूजींनी सुरू केला होता, त्यामुळे सर्वांनी त्याचा वापर केला, असे त्यांनी म्हटले आहे. सामान्य माणसे असे बोलत असतील तर समजते, पण संसद सदस्य असे बोलत असतील तर ते योग्य नाही, असेही त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
राज्य सरकारमधील पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व्हिडिओमध्ये म्हणाले की, ‘जे 30 वर्षे आमदार राहिले आहेत त्यांनी माझ्या विधानसभा मतदारसंघात यावे आणि रस्ते पाहावेत. ते (रस्ते) हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन. भाजपचे नेते एकनाथ खडसे अनेक वर्षांपासून या भागातून आमदार आहेत.
संजय राऊतांनी केली होती सारवासारव
त्याचवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी म्हटले की, अशा तुलना यापूर्वीही झाल्या आहेत. हेमा मालिनी यांच्यासाठी हा सन्मान आहे. त्यामुळे त्याकडे नकारात्मक नजरेने पाहू नका. यापूर्वी लालू यादव यांनीही असेच उदाहरण दिले होते. आम्ही हेमा मालिनी यांचा आदर करतो, असेही राऊत म्हणाले.
महिला आयोगाच्या नाराजीनंतर मंत्र्यांनी माफी मागितली
दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाटील यांच्या वक्तव्याची दखल घेतली. त्यानंतर मंत्र्यांनी माफी मागितली.
Hema Malini response to Gulabrao Patil controversial statement, what exactly did she say? Read more
महत्त्वाच्या बातम्या
- TET Exam scam : तुकाराम सुपेंच्या पत्नी व मेहुण्याने लपवून ठेवलेलं 2.40 कोटींचं घबाड पोलिसांनी शोधलं…
- कोलकाता महापालिका निवडणूक : राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली फेरनिवडणुकीची मागणी, आज भाजपचा निषेध मोर्चा
- कोकणातील आंबा नवी मुंबईत आला हो; खवय्यांसाठी खुशखबर; २५ डझन आवक
- सोलापूरच्या मशिदीत प्रथमच लसीकरण शिबिर, नागरिकांचा भरभरून प्रतिसाद;४०० जणांना डोस
- परीक्षा घेण्यासंदर्भातील सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला – उदय सामंत