• Download App
    राजस्थानात हेल्मेट मोफत , दुचाकी खरेदीवेळी ग्राहकांना द्या ; वाहतूक मंत्र्यांनी दिले आदेश|Helmet free in Rajasthan, give to customers when buying a bike; Orders issued by the Minister of Transport

    राजस्थानात हेल्मेट मोफत , दुचाकी खरेदीवेळी ग्राहकांना द्या ; वाहतूक मंत्र्यांनी दिले आदेश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दुचाकीचालकांना आता हेल्मेट खरेदी करण्याची गरज नाही. हेल्मेट घालणं अनिवार्य आहे, तर खरेदी करण्याची गरज कशी लागणार नाही? असा प्रश्न पडू शकतो.Helmet free in Rajasthan, give to customers when buying a bike; Orders issued by the Minister of Transport

    मात्र राजस्थानचे वाहतूक मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी, दुचाकीच्या विक्रीवेळी आता विक्रेत्याला वाहनासोबत हेल्मेटही द्यावं लागेल, असे निर्देश दिले आहेत. चालकांची सुरक्षितता लक्षात घेता,



    गाडीसोबत फ्री हेल्मेट देण्यासाठी सांगण्यात आल्याचं, खाचरियावास यांनी सांगितलं. रस्ते अपघातातील जखमी आणि मृत्यूमुखी होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.

    अनेक जण पैशांच्या कमतरतेमुळे साधारण हेल्मेट घेतात, जे अपघातावेळी फायद्याचं ठरतच असं नाही. सरकारकडून आता ISI मार्क असणारे मजबूत हेल्मेट उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

    Helmet free in Rajasthan, give to customers when buying a bike; Orders issued by the Minister of Transport

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये