विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करून प्रचंड विजय मिळवला. पण आता माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात आमदारांच्या आकड्यांची प्रचंड खेचाखेच चालली असून दोन्ही नेत्यांनी दिल्ली गाठून लॉबिंग सुरू केले आहे.Heavy lobbying for Chief ministership of karnataka by siddaramaiah and shivkumar
बहुसंख्य काँग्रेस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. दुपारनंतर डी के शिवकुमार हे देखील दिल्लीत दाखल झाले त्यांनी आपण म्हणजेच बहुमत असा दावा करत सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याला छेद दिला. मात्र या दोन्ही नेत्यांनी बहुमताचा दावा करत असताना सोनिया गांधींच्या मताचा ठाव घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.
आपण सोनिया गांधींना आश्वासन दिले होते. त्यानुसार आपल्या नेतृत्वाखाली 135 आमदार निवडून आणले. त्यामुळे आपण म्हणजेच बहुमत असा दावा शिवकुमार यांनी केला आहे.
काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी यांनी आपला कल नेमका कोणाकडे आहे हे अजिबात सुचित केलेले नाही त्याचबरोबर त्यांनी सिद्धरामय्या शिवकुमार अथवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबरचे आपले फोटो देखील ट्विट केलेले नाहीत त्यामुळे गांधी परिवाराच्या मनात कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचे नेमके कुणाचे नाव आहे?, हे कुणालाच कळायला मार्ग नाही. निवडून आलेल्या सर्व 135 आमदारांनी काँग्रेस अध्यक्षांना म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे यांना मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार दिले आहेत. पण मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मनातल्या मुख्यमंत्र्यापेक्षा सोनियांच्या मनातल्या मनात नेमके कोणाचे नाव आहे?, त्यानुसार कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरणार आहे आणि ते नाव कोणते असू शकते त्याचा कयास बांधण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी चालविला आहे.
Heavy lobbying for Chief ministership of karnataka by siddaramaiah and shivkumar
महत्वाच्या बातम्या
- सरकार विरोधात पोलीस – प्रशासनाला चिथावणी देणे संजय राऊतांना भोवले; राऊतांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
- परीक्षेची संधी : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा; डाॅ. भारती पवारांची ग्वाही
- Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी!
- मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही